• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 14, 2022
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

जळगाव, दि.१४ – गोदावरी फाऊंडेशन संचालित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च एमबीए महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रिया फालक यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार वाहून अभिवादन केले.

डॉ. प्रशांत वारके यांनी आपल्या मनोगतातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक पैलू उलगडले. ज्ञान, दूरदृष्टी, उत्कृष्ट नियोजक, वाचक अशा विविध पैलूंचा मागोवा घेताना डॉ. बाबासाहेबांच्या जीवनातील वेगवेगळ्या घटनांचे दाखले दिले. संविधानाच्या रूपाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला मोठी देणगी दिली आहे. बौद्धिक संपत्तीवर विजय मिळविला तरच आपण पुढे जाऊ शकतो हा डॉ. बाबासाहेबांचा विचार त्यांनी सांगितला.

युवकांनी भारतीय समाज सुधारकांच्या साहित्याचे वाचन करणे आवश्यक आहे. यामुळे देश सशक्त होण्यास मदत होईल. महाविद्यालयातील प्रा. प्राजक्ता पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर माहिती दिली. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. एमबीएच्या प्रथम वर्षातील दिव्या तळेकर या विद्यार्थिनीने आभार प्रदर्शन केले.

यावेळी महाविद्यालयाच्या डॉ.नीलिमा वारके, प्रा.मकरंद गोडबोले, प्रा.प्राजक्ता पाटील, प्रा.चेतन सरोदे, डॉ.अनुभूती शिंदे, प्रा.भाग्यश्री पाटील, प्रा.आफ्रिन खान, प्रा.अश्विनी सोनवणे, प्रा.श्रुतिका नेवे, प्रा.मिताली शिंदे, प्रा.प्रिया फालक, प्रा.चंद्रकांत डोंगरे, प्रा.दिपक दांडगे, मयुर पाटील, गौरव पाटील, सागर चौधरी, गणेश सरोदे, प्रशांत किरंगे, जीवन पाटील, प्रफुल्ल भोळे, रुपेश पाटील, घनश्याम पाटील, रुपेश तायडे, जयश्री चौधरी, भावना ठाकूर आदी कर्मचारी उपस्थित होते.

Next Post
महावीर जन्मकल्याणक महोत्सव साजरा

महावीर जन्मकल्याणक महोत्सव साजरा

ताज्या बातम्या

जिद्द आणि संघर्षातून शिक्षणाची नवी ओढ; संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘गुरुजी’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन
खान्देश

जिद्द आणि संघर्षातून शिक्षणाची नवी ओढ; संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘गुरुजी’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन

January 30, 2026
विज्ञानाचा अविष्कार: महाविद्यालयात रंगले ‘इस्रो’च्या उपग्रहांचे पोस्टर प्रदर्शन!
जळगाव जिल्हा

विज्ञानाचा अविष्कार: महाविद्यालयात रंगले ‘इस्रो’च्या उपग्रहांचे पोस्टर प्रदर्शन!

January 30, 2026
जळगाव जिल्ह्यात १० वी, १२ वीच्या परीक्षेवर ‘ड्रोन’ची नजर; कॉपीबहाद्दरांवर थेट फौजदारी कारवाई!
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात १० वी, १२ वीच्या परीक्षेवर ‘ड्रोन’ची नजर; कॉपीबहाद्दरांवर थेट फौजदारी कारवाई!

January 30, 2026
रामराज्याच्या संकल्पनेसाठी जळगावमध्ये १ फेब्रुवारीला ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’!
खान्देश

रामराज्याच्या संकल्पनेसाठी जळगावमध्ये १ फेब्रुवारीला ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’!

January 29, 2026
नाईट फुटबॉल स्पर्धेत जैन इरिगेशनचे निर्भेळ यश; अंतिम सामन्यात जालन्याचा पराभव
क्रिडा

नाईट फुटबॉल स्पर्धेत जैन इरिगेशनचे निर्भेळ यश; अंतिम सामन्यात जालन्याचा पराभव

January 28, 2026
पावसाच्या व्यत्ययानंतरही जळगावकरांची ‘खाऊ गल्ली’वर गर्दी; बहिणाबाई महोत्सवाचा असा झाला समारोप!
जळगाव जिल्हा

पावसाच्या व्यत्ययानंतरही जळगावकरांची ‘खाऊ गल्ली’वर गर्दी; बहिणाबाई महोत्सवाचा असा झाला समारोप!

January 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group