• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महावीर जन्मकल्याणक महोत्सव साजरा

भविष्यात जळगाव सकल जैन समाज भारतात अव्वल ठरणार.. - राजेंद्र लुंकड, राष्ट्रीय अध्यक्ष

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 14, 2022
in जळगाव जिल्हा, धार्मिक, सामाजिक
0
महावीर जन्मकल्याणक महोत्सव साजरा

जळगाव, दि. १४ – जैन समाजाच्या परंपरेत जळगावची विशेष ओळख आहे, ज्या वेगाने प्रगतीकडे मार्गक्रमण सुरू आहे तीच गती कायम राहिल्यास येणाऱ्या पाच वर्षात जळगावचा सकल जैन समाज भारतात अग्रस्थानी असेल याचा मला दृढ विश्वास आहे’, असे प्रतिपादन बीजेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र लुंकड यांनी केले. शहरातील सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव समितीद्वारे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाच्या निमित्त बालगंधर्व नाट्यगृहात विशेष कार्यक्रम आयोजित केला होता त्यात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर सकल संघाचे अध्यक्ष दलीचंदजी जैन, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, महापौर जयश्री महाजन, आ. सुरेश भोळे, रमेश जैन, प्रदीप रायसोनी, सुशील बाफना, माजी खासदार ईश्वरलाल जैन, अजय ललवाणी, स्वरूपचंदज कोठारी, कमलादेवी कोठारी, महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीचे अध्यक्ष स्वरूप लुंकड, कस्तुरचंद बाफना, ललीत लोढाया, राजेश श्रावगी, माणकचंद बैद आदी मान्यवर उपस्थित होते. आरंभी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण, ध्वजवंदन, माल्यार्पण व दीपप्रज्ज्वलन झाले.

शहरातील सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव समितीद्वारे सकाळी वासूपूज्य मंदिरापासून शोभा यात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत भगवान महावीर यांचे संदेश असलेले फलक, बेटी बचावो, बेटी पढाओ या सारखे सामाजिक संदेशाचे सादरीकरण, पारंपरिक वेशभूषा, शहरातील स्त्री-पुरूष, युवावर्ग मोठ्या उत्साहाने या शोभायात्रेत सहभागी झालेला होता. ही शोभायात्रा सुभाष चौक मार्गे बालगंधर्व नाट्यगृहापर्यंत पोहोचली. या शोभायात्रेचे धार्मिक सभेत रूपांतर झाले.

यावेळी प्रमुख पाहुणे, वक्ते राजेंद्र लुंकड यांनी सुसंवाद साधला. जळगावच्या वैभवात ज्यांनी भर घातली त्या स्व. भवरलालजी जैन, स्व.आर.सी. बाफना तसेच सुरेशदादा जैन यांचा आवर्जून उल्लेख केला. जैन समाजातील १६ हजारहून अधिक साधू- साध्वी आहेत, त्यांचे विचार, मार्गदर्शन आणि संस्कार समाजाला मिळतात. परंतु बाह्य वातावरण दूषित झालेले आहे, अशा वातावरणात आपले स्वत्व टिकविणे आवश्यक आहे. ही अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

भगवान महावीरांच्या विचारांची गरज संपूर्ण जगाला आता अंमलात आणण्याची आवश्यकता आहे. या विचारांचे फक्त चिंतन करून भागणार नाही तर प्रत्यक्ष आचरण करण्याची नितांत आवश्यकता आहे, स्वामी विवेकानंद आणि त्यांच्या आईचे त्यांनी उदाहरण दिले. स्वामी विवेकानंद अर्थात नरेंद्र विदेशात आपले विचार व्यक्त करण्यासाठी जाणार होते परंतु त्यांच्या आईने त्यांना आशीर्वाद दिलेला नव्हता. आईने नरेंद्रला स्वयंपाल घरातील सुरी आणण्यास सांगितली. नरेंद्रने ती सुरी आणली सुरीची मुठ आईच्या दिशेने व टोकदार भाग स्वतःकडे ठेवला आणि आईने तत्पर नरेंद्रला आशीर्वाद दिला तो अशाकरीता की माझ्या नरेंद्रकडून जे काम होईल ते चांगलेच होईल. या पद्धतीने युवावर्गाने चांगले आचरण करावे असे आवाहनही राजेंद्र लुंकड यांनी आपल्या भाषणात केले. जीवदया संस्कार म्हणून स्वीकारलेला आहे अशा सकल जैन संघाच्या उपक्रमाचेही त्यांनी कौतुक केले.

नम्रता, संस्कार हा जैन समाजाचा गुण – गुलाबराव पाटील
पालमंत्री गुलाबराव पाटील यांनी जैन समाजाचे कौतुक करताना सांगितले की, नम्रता, दातृत्व, कर्तृत्व हा जैन समाजाचा गुण आहे. कोरोनासारख्या संकटात जैन उद्योग समूह व जैन समाजातील मान्यवरांनी गरजूंना भोजनापासुन ते कोवीड सेंटर, उपचारापर्यंत आवश्यक ती मदत केली. आपण दलुभाऊ जैन व श्रद्धेय मोठेभाऊ यांच्याकडून दातृत्व व नम्रता हे संस्कार घेतले असा उल्लेख जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आवर्जून केला.

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाच्या निमित्ताने मॉडर्न गर्ल हायस्कूल व बालगंधर्व नाट्यगृहात रक्तदान शिबीर घेण्यात आले होते. रेडक्रॉस सोसायटी आणि गोळवलकर रक्तपेढीने रक्त संकलन केले. एकूण ३५० रक्ताच्या बाटल्यांचे यावेळी संकलन झाले. त्यासाठी जय आनंद ग्रुपच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. याच कार्यक्रमात शेकडो सदस्यांनी देहदान व नेत्रदानाचे संकल्प पत्र भरून घेतले. सकल जैन संघातर्फे गत दहा वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे.

 

Next Post
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्साहात रंगले कवि संमेलन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्साहात रंगले कवि संमेलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव येथे राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’ला प्रारंभ
जळगाव जिल्हा

जळगाव येथे राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’ला प्रारंभ

February 4, 2023
लाडवंजारी समाज बांधवांची राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी घेतली भेट
जळगाव जिल्हा

लाडवंजारी समाज बांधवांची राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी घेतली भेट

February 4, 2023
कजगाव ग्रामपंचायतीकडून दिव्यांग तरुणींना सायकल वाटप
जळगाव जिल्हा

कजगाव ग्रामपंचायतीकडून दिव्यांग तरुणींना सायकल वाटप

February 3, 2023
शिवसेना (ठाकरे गट) महिला आघाडीची बैठक संपन्न
जळगाव जिल्हा

शिवसेना (ठाकरे गट) महिला आघाडीची बैठक संपन्न

February 2, 2023
कृषिक्षेत्रासाठी अर्थसंकल्पाची सप्तर्षी.. – अशोक जैन अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.
जळगाव जिल्हा

कृषिक्षेत्रासाठी अर्थसंकल्पाची सप्तर्षी.. – अशोक जैन अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.

February 1, 2023
मनसेच्या ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
जळगाव जिल्हा

मनसेच्या ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

January 31, 2023
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

कॉपी करू नका.