जळगाव, दि.१४ – महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती प्रित्यर्थ जळगावातील सीताबाई गणपत भंगाळे विद्यालयात गुरूवारी कवी संमेलन घेण्यात आले. आपल्या कवितांच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेली समता घराघरात पोहोचविण्याचे आवाहन समतावादी साहित्य शिक्षक मंडळाचे अध्यक्ष प्रा.भरत शिरसाट यांनी बोलताना केले.
प्रा.डॉ.अतुल सूर्यवंशी यांचे हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी माजी महापौर व सिनेट सदस्य विष्णू भंगाळे, शिक्षण विस्तार अधिकारी रविकिरण बिऱ्हाडे, समता शिक्षक परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष भीमराव सपकाळे यांची प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थिती होती. प्रा.विमल वाणी, प्रा.कमलेश गायकवाड, एस.ए. पाटील, रणजित सोनवणे, सागर कोळी, प्रकाश पाटील, गणेश निकम, रेखा पाटील, रंजना कोळी- इंगळे, भीमराव सोनवणे, अजय भामरे, गिरीश जाधव, दिनेश मोरे, कैलास पवार, शंकर भामेरे, जीवन कुमार शिरसाट, श्रीमती वर्षा अहिरराव, विजय सूर्यवंशी, आर.जे.सुरवाडे, ईश्वर वाघ, विनोद जाधव, रमेश बनकर, यशवंत कापडे, सुमेध साळवे आदी २६ कवींनी उपस्थिती देत आपल्या कवितेचे सादरीकरण केले.
याशिवाय १० बाल कवींनी आपल्या कविता सादर केल्या. सर्वच कवींचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रशस्ती पत्र व ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मोठ्या प्रमाणावर श्रोते व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव एस.ए.पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद आठवले, रंजना इंगळे, अश्विनी कोळी व वर्षा अहिरराव यांनी केले. मंडळामार्फत घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण देखील यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे कोषाध्यक्ष रणजीत सोनवणे, जीवन कुमार शिरसाट, श्रीमती वर्षा अहिरराव हेमेंद्र सपकाळे, गिरीश जाधव, भारती ठाकरे, अश्विनी कोळी, रंजना इंगळे, अजय भामरे, शंकर भामेरे यांनी परिश्रम घेतले.