• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांची ‘महापौर सेवा कक्षा’ला भेट

महापौरांच्या अभिनव उपक्रमाचे केले कौतुक

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 30, 2022
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांची ‘महापौर सेवा कक्षा’ला भेट

जळगाव, दि. ३० – युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी युवासेना निश्चय दौर्‍यावेळी वेळात वेळ काढून शहरातील आकाशवाणी चौकाजवळ कार्यान्वित ‘महापौर सेवा कक्षा’ला सदिच्छा भेट दिली. तसेच तेथील कार्यरत सहकार्‍यांकडून संपूर्ण कार्यप्रणाली समजावून घेत वर्षभरात जवळपास दहा हजारांवर जळगावकरांच्या समस्या/तक्रारींचे निवारण झाल्याची माहिती जाणून घेतली.

‘कोविड-१९’च्या अनुषंगाने ज्या नागरिकांचे पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झाले असतील, त्यांनी दुसरा डोस त्वरित घ्यावा, असे आवाहन ‘महापौर सेवा कक्ष’तर्फे करण्यात आले होते. त्याला जळगावकरांचा उत्तम प्रतिसाद लाभला आदी सर्व माहिती ‘महापौर सेवा कक्ष’च्या प्रतिनिधींकडून सरदेसाई यांनी जाणून घेतली.

महापौर जयश्री सुनिल महाजन यांच्या या अभिनव उपक्रमाचे वरुण सरदेसाई यांनी तोंडभरून कौतुक केले. तसेच हा उपक्रम यशस्वितेसाठी करीत असलेल्या सहकार्याबद्दल महापालिका आयुक्त, उपायुक्त, सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचार्‍यांचे अभिनंदन करून त्यांनाही मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे यापुढेही हा उपक्रम असाच अविरत सुरू ठेवला जावा, असेही सुचविले.

याप्रसंगी महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री सुनिल महाजन यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, जळगाव शहर महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, युवा सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख आविष्कार भुसे, महाराष्ट्र सहसचिव विराज कावडिया, शिवराज पाटील, चंद्रकांत शर्मा, पंकज राणे, स्वप्नील परदेशी, विशाल वाणी, अमित जगताप, पियूष हासवाल, संकेत कापसे आदींसह युवा सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Next Post
जैन इरिगेशनच्या कर्ज निराकरण योजनेची यशस्वी अंमलबजावणी पूर्ण

जैन इरिगेशनच्या कर्ज निराकरण योजनेची यशस्वी अंमलबजावणी पूर्ण

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात गुरूपोर्णिमा साजरी
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात गुरूपोर्णिमा साजरी

July 30, 2026
शेतात अश्लील चाळे करणाऱ्यांचा पर्दाफाश, राजस्थानच्या १० महिलांसह २३ जण ताब्यात
गुन्हे

शेतात अश्लील चाळे करणाऱ्यांचा पर्दाफाश, राजस्थानच्या १० महिलांसह २३ जण ताब्यात

July 30, 2026
कॅन्सरच्या गाठी काढून महिलेला दिले नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

कॅन्सरच्या गाठी काढून महिलेला दिले नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

July 30, 2026
‘योगपर्व २०२६’: रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या स्थापना समारंभात गोदावरी नर्सिंग कॉलेजचा सक्रिय सहभाग
जळगाव जिल्हा

‘योगपर्व २०२६’: रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या स्थापना समारंभात गोदावरी नर्सिंग कॉलेजचा सक्रिय सहभाग

July 30, 2026
शाळा कॉलेज परिसरात वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; २४ पालकांचे समुपदेशन, दीड लाखांचा दंड!
गुन्हे

शाळा कॉलेज परिसरात वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; २४ पालकांचे समुपदेशन, दीड लाखांचा दंड!

July 30, 2026
नशिराबाद येथे ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत आरोग्य जनजागृती
आरोग्य

नशिराबाद येथे ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत आरोग्य जनजागृती

July 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add