• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ६५० किलो वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प होणार

जिल्हा नियोजन समितीत प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 23, 2022
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ६५० किलो वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प होणार

जळगाव, दि.२३ – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ६५० किलो वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प आस्थपित करण्यासाठी जळगाव जिल्हा नियोजन समितीने ३ कोटी ६६ लाख ७१ हजार ९ ६० रूपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता दिली आहे . अशी माहिती कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विद्यापीठात सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करण्यासाठी विद्यापीठाने ९ मार्च २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला होता . जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तातडीने याबाबतीत महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण ( महाऊर्जा ) कार्यालयाला सर्वेक्षण व अंदाजपत्रकाचे निर्देश दिले. महाऊर्जाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी तातडीने हालचाली करून सर्वेक्षण तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केल्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या लेखाशिर्षात असलेल्या अपारंपरीक ऊर्जा विकास अनुदान योजनेतून हे अनुदान देण्यास प्रशासकीय मान्यता दिलेली आहे.

कॅपेक्स मोड ( भांडवली खर्चाचे मॉडेल ) पध्दती अंतर्गत ६५० किला वॅट क्षमता असलेला पारेषण संलग्न सौर ऊर्जा प्रकल्प आस्थपित केला जाणार आहे . प्रस्ताव सादर केल्या नंतर अवघ्या पंधरा दिवसांच्या आत प्रशासकीय मान्यता देण्यात आली हे विशेष, या प्रकल्पामुळे विद्यापीठात मोठ्या प्रमाणात विजेची बचत होणार आहे.

सद्या विद्यापीठाला सुमारे २ हजार किलो वॅट चा मंजूर अधिभार आहे . हा प्रकल्प सुरु झाल्यानंतर किमान एक तृतीयांश वीजेची बचत होणार आहे . पहिल्या टप्प्यात विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत हा प्रकल्प कार्यान्वीत केला जाणार आहे. निधी प्राप्त झाल्यानंतर लवकरच या प्रकल्पाच्या कामाला सुरूवात होईल. अशी माहिती कुलगुरू प्रा.माहेश्वरी यांनी दिली.

Next Post
गांधीतीर्थतर्फे नववर्ष स्वागतार्थ पीसवॉकचे आयोजन

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे व्हॉलींटीयरांना संधी

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती
जळगाव जिल्हा

बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती

September 17, 2026
उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 
जळगाव जिल्हा

उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add