लालसिंग पाटील | भडगाव | तालुक्यातील कजगाव येथे रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकान फोडत रोकड लांबवल्याचा प्रकार समोर आलायं. यात नवकार मेडिकल व महावीर प्रोव्हिजन अशी दोन दुकाने फोडण्यात आली असून गल्ल्यातील रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले आहेत.
दरम्यान महिनाभरापूर्वी चोरट्यांनी गावात चोर्यांचा सपाटा लावला होता. तद्नंतर आता बुधवारी पहाटे पुन्हा गावात चोरट्यांनी डोके वर काढले आहे. बाजारपेठेत पोलीस मदत केंद्र देण्यात आले आहे. मात्र या मदत केंद्रात कर्मचारीच नसल्याने बाजारपेठेची सुरक्षा धोक्यात आली असल्याचे नागरिकांकडून बोलले जातेयं.
यावेळी घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे, सहाय्यक फौजदार छबुलाल नागरे, ईश्वर पाटील आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन, सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये अज्ञात चोरटा कैद झाल्याचे फुटेज पोलिसांनी हस्तगत केले.