• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

तरसोद ते चिखली फोर वे महामार्ग मुदतीच्याआत पूर्ण- VIDEO

नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी केले कौतुक..

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 18, 2021
in जळगाव जिल्हा
0
तरसोद ते चिखली फोर वे महामार्ग मुदतीच्याआत पूर्ण- VIDEO

हेमंत पाटील | जळगाव | राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 हा चार पदरी महामार्ग चिखली पासून तर थेट जळगावातील तरसोद गावापर्यंत मुदतीच्या आत पुर्ण करण्यात आलायं. साधारण 63 किलोमीटरचा हा महामार्ग मुदतीच्या आतच पूर्ण झाल्यान समाधान व्यक्त होतंय.

वर्ष 2019 मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने विल्सपन इंटरप्राइजेसला हे काम देण्यात आलं होतं. यासाठी गुजरात येथील आयुष प्रोकाँन आणि हरियाणा येथील गवार कन्स्ट्रक्शन या कंपन्यांनी चार पदरी महामार्ग प्रकल्पासाठी साथ दिली.
यानंतर पूर्णत्वास आला हा शानदार चार पदरी राष्ट्रीय महामार्ग..
या महामार्ग संदर्भात लोकप्रतिनिधींनी कौतुक करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

दरम्यान या महामार्गावरील टोल प्लाझा येथे 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
गुजरातच्या कच्छभुज येथील आयुष प्रोकाॅन ही अशी संस्था आहे की देश आणि समाजाच्या प्रति आपली जबाबदारी योग्य रीतीने पूर्ण करते. आयुष प्रोकाँनचे प्रमुख युवराज राजन यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील महिला सशक्तिकरणावर विशेष लक्ष केंद्रित करत असते. त्याचबरोबर येथील युवा टीम मध्ये महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून यश संपादीत करीत असल्याची प्रतिक्रिया देत अधिकारी वर्गाने देखील सर्व टीमचे कौतुक केले.

चिखली पासून तरसोद पर्यंत तयार करण्यात आलेल्या या महामार्गामुळे अनेकांना मोठ्या प्रमाणावर वाहतुकीसाठी फायदा होणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना देखील सुविधा होणार आहे. रस्ते चांगले असतील तर अपघात काही प्रमाणात का होईना नक्कीच टाळता येतील. या महामार्गाच्या कामाबद्दल नागरिकांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या.

विल्सपन इंटरप्राइजेसच्या मार्गदर्शनाखाली आयुष प्रोकाँन आणि गवार कन्स्ट्रक्शन च्या वतीने करण्यात आलेल्या महामार्गावर पर्यावरणाचा देखील विचार करण्यात येऊन ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे. त्याचबरोबर टोल प्लाझा जवळ लाॅन चे देखील नियोजन करण्यात आलंय. देशाच्या विकासासाठी राज्यांना जोडले जाणारे महामार्ग हे महत्वाचे मानले जातात. आणि हे काम चांगल्या गुणवत्तेचे असेल तर नक्कीच देशाची प्रगती वेगाने होईल.

 


Tags: Four wayJalgaon newsKhandesh Prabhatजळगावनॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया
Next Post
कजगावात चोरट्यांनी दोन दुकाने फोडली

कजगावात चोरट्यांनी दोन दुकाने फोडली

ताज्या बातम्या

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव जिल्हा

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप

July 12, 2025
जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 12, 2025
जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव
जळगाव जिल्हा

जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव

July 11, 2025
पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
जळगाव जिल्हा

पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 11, 2025
मुलांनी केले आई-वडिलांचे पाद्यपूजन, व्यक्त केली कृतज्ञता
जळगाव जिल्हा

मुलांनी केले आई-वडिलांचे पाद्यपूजन, व्यक्त केली कृतज्ञता

July 11, 2025
जिल्ह्यात हातभट्टी दारूविरुद्ध मोठी कारवाई: १४ लाखांचा मुद्देमाल जप्त; १३४ गुन्हे दाखल
गुन्हे

जिल्ह्यात हातभट्टी दारूविरुद्ध मोठी कारवाई: १४ लाखांचा मुद्देमाल जप्त; १३४ गुन्हे दाखल

July 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group