• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

यावलला मोफत आरोग्य तपासणी शिबिरात १८६ रुग्णांनी घेतला लाभ

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 4, 2022
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
यावलला मोफत आरोग्य तपासणी शिबिरात १८६ रुग्णांनी घेतला लाभ

यावल, दि.०४ – गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यावल येथील शेख अजहर शेख समसुद्दीन, भाऊ गृप, इस्लामपूर बॉईज, आर्यन बॉय यांच्या संयुक्‍त विद्यमाने शुक्रवारी मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात मोफत इसीजी कार्डिओग्राफ, मधुमेह, रक्‍तदाब तपासणी करण्यात आली.

शहरातील आठवडेबाजार जवळील इस्लामपूरा येेथे सर्वप्रथम रुग्णांची नावनोंदणी करण्यात आली. रुग्णांचे लक्षण जाणून घेत निष्णात डॉक्टरांनी मोफत सल्‍ला दिला. यात मुतखडा, नेत्रविकार, मुत्रपिंडातील खडे, प्रोस्टेट, पित्‍ताशय खडा, थायरॉईड, पाईल्स, आतड्यांचे क्षयरोग, लिव्हरचे आजार, गर्भाशयाचा ट्यूमर, अंडाशयाच्या गाठी आदी प्रकारच्या आजाराने रुग्ण त्रस्त असल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान शिबिरात १८६ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून ६१ रुग्णांना सोनोग्राफी किंवा विविध रक्‍त-लघवीच्या तपासण्या याशिवाय काही शस्त्रक्रियांची आवश्यकता भासली, त्यांना पुढील तारीख देऊन रुग्णालयात येण्याच सल्‍ला दिला. रुग्णांनी सोबत येतांना ओरिजिनल आधार कार्ड व रेशन कार्ड आणण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. यामुळे रुग्णांना रुग्णालयातही मोफत उपचार मिळणार आहे.

आरोग्य शिबिर यशस्वीतेसाठी डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाचे दिपक पाटील, तुषार सुरे, किशोर महाजन, यावलमधील शेख अजहर शेख समसुद्दीन, भाऊ गृप, इस्लामपूर बॉईज, आर्यन बॉय यांचे अनमोल सहकार्य लाभले.

मानसिक आजारांवरही मार्गदर्शन
शिबिरामध्ये मानसोपचार तज्ञ डॉ.मुजाहिद शेख यांनी रुग्णांची तपासणी केली. यात डोकेदुखी, भास होणे, संशय येणे, दारुचे व्यसन, ताणतणाव चिंता, उदासिनता, लैगिंक समस्या, झोपेचे आजार व लहान मुलांमधील मानसिक समस्यांनी त्रस्त रुग्णांनी तज्ञांचा सल्‍ला घेतला.

यावेळी मेडिसीनचे डॉ.तेजस कोटेचा, सर्जरी डॉ.अनिश जोशी, नेत्र विभागातील डॉ.कल्पना देशमुख, स्त्रीरोग डॉ. विवेक कोल्हे, कान-नाक-घसा तज्ञ आकाश सोनवणे, हाडांचे डॉ.परिक्षीत पाटील यांनी रुग्णांची तपासणी केली. त्यांना नर्सिंग स्टाफचे सहकार्य लाभले.

Tags: डाॅ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय
Next Post
तब्बल तीन एकरात अफूची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस  VIDEO

तब्बल तीन एकरात अफूची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस VIDEO

ताज्या बातम्या

सायबर पोलिसांची मोठी कारवाई; साडेबारा लाखांचे ६२ गहाळ मोबाईल हस्तगत, मूळ मालकांना केले वाटप
खान्देश

सायबर पोलिसांची मोठी कारवाई; साडेबारा लाखांचे ६२ गहाळ मोबाईल हस्तगत, मूळ मालकांना केले वाटप

October 18, 2025
सर्वसामान्य जनतेची कामे करणारे आणि माणसांमध्ये मिसळणारा माणूस म्हणजे आयुष्य प्रसाद – पालकमंत्री गुलाबराव पाटील
खान्देश

सर्वसामान्य जनतेची कामे करणारे आणि माणसांमध्ये मिसळणारा माणूस म्हणजे आयुष्य प्रसाद – पालकमंत्री गुलाबराव पाटील

October 18, 2025
सुरक्षित दिवाळीसाठी जळगाव पोलीस दलाचे जाहीर आवाहन; ‘सुरक्षितता’ व ‘सावधानता’ जपा!
खान्देश

सुरक्षित दिवाळीसाठी जळगाव पोलीस दलाचे जाहीर आवाहन; ‘सुरक्षितता’ व ‘सावधानता’ जपा!

October 17, 2025
बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल
खान्देश

बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल

October 16, 2025
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त
खान्देश

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त

October 16, 2025
संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group