• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गांधीतीर्थ हे तर भारतातील पाचवे धाम.. – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

तरुण पिढी सह सर्वांसाठीचे हे प्रेरणास्थान असल्याचा गौरव

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 28, 2022
in जळगाव जिल्हा
0
गांधीतीर्थ हे तर भारतातील पाचवे धाम.. – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

जळगाव दि.२८ – पूज्य बापूंच्या स्मरणार्थ बांधलेले गांधी धाम हे भारतातील पाचवे धाम असल्याचे दिसते. बापूंचे जीवन आणि जीवन दृश्य येथे चित्रित केले आहे. लहान मुली-मुले आणि तरुण पिढी येथे येऊन प्रेरणा घेऊ शकतात. गांधीजींच्या सत्य, अहिंसा, स्वदेशी, सदाचार आदींचे शिक्षण घेऊन देश चालवणारे देशाला नवी दिशा देऊ शकतात. भवरलाल जैन यांची कल्पनाशक्ती वाखाणण्याजोगी आहे. बापूंच्या चरणी विनम्र अभिवादन! अशी लिखीत प्रतिक्रिया महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नोंदविली. महामहीम राज्यपाल यांनी जैन हिल्सस्थित गांधीतीर्थ ला भेट दिली.  गांधी तीर्थ येथे जैन इरिगेशनचे अध्यक्ष तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक अशोक जैन, डॉ. सुदर्शन आयंगार यांनी त्यांचे स्वागत केले, या वेळी अतुल जैन सोबत उपस्थित होते.

संपूर्ण जगाला गांधी विचारांची अनिवार्यता असून गांधी विचारांचे संस्कार अत्याधुनिक पद्धतीने युवा पिढीसमोर गांधी तीर्थ पोहचवित आहे. त्यांचे हे कार्य पाहून माननीय राज्यपाल भारावले. जगातिल सुप्रसिद्ध अशा ऑडिओ गाईडेड म्युझियम खोज गांधीजी की या संग्रहालयास महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सुमारे तासभर भेट दिली. गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त अशोक जैन, डॉ.सुदर्शन आयंगार यांनी राज्यपाल महोदयांचे सुतीहार देऊन स्वागत केले. गांधी रिसर्च फाउंडेशनचे मुख्य समन्वयक उदय महाजन, डॉ.अश्विन झाला, नितीन चोपडा उपस्थित होते.

गांधी तीर्थ साकारतांना भवरलालजी जैन यांनी शेती, माती, पाणी आणि शेतकरी तसेच देशाचा, तरुणाईच्या भल्याचा विचार केला. तरुणांना गांधीजींचा आदर्श अनुभवता यावा यासाठी त्यांनी जैन हिल्स येथे गांधी रिसर्च फाउंडेशन, गांधी तीर्थची निर्मिती केली. या माध्यमातून युवाशक्ती, तरुणांबद्दल तसेच ग्रामविकास, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्याबाबत ते सदैव प्रयत्नशील होते. त्यादृष्टीने गांधी रिसर्च फाउंडेशनचे निर्मिती उद्दीष्टाचे कार्य आजदेखील प्रभावीपणे होत आहे.

Next Post
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

ताज्या बातम्या

महिलांच्या आरोग्य हक्कांविषयी जनजागृतीसाठी परिसंवाद; गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचा उपक्रम
आरोग्य

महिलांच्या आरोग्य हक्कांविषयी जनजागृतीसाठी परिसंवाद; गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचा उपक्रम

May 30, 2026
आय.पी.एल. चा थरार जळगावकर अनुभवणार एलईडी स्क्रीनवर!
क्रिडा

आय.पी.एल. चा थरार जळगावकर अनुभवणार एलईडी स्क्रीनवर!

May 30, 2026
चोपड्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; ६ महिलांची सुटका, ११ जणांवर गुन्हा दाखल
गुन्हे

चोपड्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; ६ महिलांची सुटका, ११ जणांवर गुन्हा दाखल

May 30, 2026
भुसावळात ३० हजारांची लाच मागणाऱ्या फौजदारासह खाजगी इसमावर गुन्हा; पोलीस उपनिरीक्षक फरार!
गुन्हे

भुसावळात ३० हजारांची लाच मागणाऱ्या फौजदारासह खाजगी इसमावर गुन्हा; पोलीस उपनिरीक्षक फरार!

May 29, 2026
पर्यावरण संरक्षणासाठी मोठे पाऊल: डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘झिरो डिस्चार्ज’ एसटीपी प्रकल्प कार्यान्वित
जळगाव जिल्हा

पर्यावरण संरक्षणासाठी मोठे पाऊल: डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘झिरो डिस्चार्ज’ एसटीपी प्रकल्प कार्यान्वित

May 29, 2026
विधानपरिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था जागेसाठी​भाजपकडून डॉ. केतकी पाटील यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत!
जळगाव जिल्हा

विधानपरिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था जागेसाठी​भाजपकडून डॉ. केतकी पाटील यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत!

May 29, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group