जळगाव, दि.१६ – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महानगरतर्फे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांची आरोग्य तपासणी शिबिर जळगावात घेण्यात आले. तसेच गरीब व गरजूंना ब्लँकेट वाटप करण्यात आले.
त्याच बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते आर.आर.पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आणि शहरातील उद्योजक हितेश कदम यांचे निधन झाल्याने श्रद्धांजली वाहण्यात आली.
दरम्यान आरोग्य तपासणी शिबिरात रक्तदाब व रक्तातली साखर तपासणी करण्यात आली. पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला. तसेच गरीब व गरजूंना पन्नास ब्लँकेट वाटप करण्यात आल्या. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्रनाना पाटील, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, डॉ. एन.डी. पाटील, सामाजिक न्याय जिल्हा उपाध्यक्ष रमेश बहारे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थिती होते.
कार्यक्रमाप्रसंगी डॉ.एन.डी पाटील यांनी मधुमेह व रक्तदाब विकारांत विषयी माहिती देताना रोज सकाळी ४५ मिनिटे फिरणे, व्यायाम, आहार विहार संदर्भात मार्गदर्शन केले.
यावेळी जळगाव शहर संघटन प्रमुख राजु मोरे, महानगर सरचिटणीस सुनील माळी, विशाल देशमुख, भगवान सोनवणे, अकिल पटले, अनिल पवार, संजय जाधव, अशोक सोनवणे, सुशील शिंदे, जितू बागरे, किशोर सूर्यवंशी, जयश्री पाटील, युवती महानगराध्यक्ष आरोही नेवे, दिव्या भोसले, कोमल पाटील, किरण चव्हाण, संजय हरणे, नामदेव पाटील, दिपक पाटील, सतिश चव्हाण इत्यादी उपस्थित होते.