• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

७० वर्षीय वृद्धाच्या मुतखड्याची दोन टाक्यांत यशस्वी शस्त्रक्रिया

महादेव हॉस्पिटलच्या युरो तज्ज्ञांचे यश; १० वर्षांपासून शरीरात असलेला स्टेन्टही काढला

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 29, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, सामाजिक
0
७० वर्षीय वृद्धाच्या मुतखड्याची दोन टाक्यांत यशस्वी शस्त्रक्रिया

जळगाव, प्रतिनिधी :  मुतखड्याच्या उपचारादरम्यान शरीरात बसविण्यात आलेला स्टेन्ट तब्बल दहा वर्षे तसाच राहिल्याने निर्माण झालेली गुंतागुंत महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथील युरोलॉजी तज्ज्ञांनी यशस्वीरीत्या दूर केली. ७० वर्षीय वृद्ध रुग्णाच्या मूत्राशयाच्या परिसरात तयार झालेले प्रत्येकी सुमारे सहा सेंटीमीटर आकाराचे दोन मोठे खडे आणि दहा वर्षांपूर्वी बसविण्यात आलेला स्टेन्ट अत्याधुनिक शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात डॉक्टरांना यश आले. विशेष म्हणजे अवघ्या दोन टाक्यांच्या साहाय्याने ही शस्त्रक्रिया करण्यात आली. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णावर ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, रावेर तालुक्यातील ७० वर्षीय रुग्णावर सुमारे दहा वर्षांपूर्वी मुतखड्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी उपचाराचा एक भाग म्हणून मूत्रमार्गात स्टेन्ट बसविण्यात आला होता. शस्त्रक्रियेनंतर साधारण महिनाभराने हा स्टेन्ट काढणे आवश्यक होते. मात्र, रुग्णाकडून तो काढण्याचे राहून गेले. परिणामी, तब्बल दहा वर्षे हा स्टेन्ट शरीरातच राहिला. कालांतराने त्याभोवती खडे तयार होऊन रुग्णाला त्रास होऊ लागला.

या त्रासामुळे रुग्णाने महादेव हॉस्पिटलमधील युरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. हेमंत केळकर, डॉ. हर्षद चव्हाण या तज्ज्ञांकडे तपासणी केली.

आवश्यक वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर मूत्राशयाच्या परिसरात प्रत्येकी सुमारे सहा सेंटीमीटर आकाराचे दोन मोठे खडे आणि जुना स्टेन्ट असल्याचे निदान झाले. रुग्णाचे वय लक्षात घेता तसेच दीर्घकाळ शरीरात राहिलेल्या स्टेन्टमुळे निर्माण झालेली गुंतागुंत पाहता काळजीपूर्वक शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात आले.त्यानुसार डॉक्टरांनी पीसीसीएलटी (पर्क्युटेनिअस सिस्टोलिथोट्रेप्सी) आणि पीसीएनएल (पर्क्युटेनिअस नेफ्रोलिथोटे्रप्सी)या आधुनिक शस्त्रक्रिया पद्धतींचा वापर केला. अत्यंत कौशल्याने दोन्ही मोठे खडे फोडून बाहेर काढण्यात आले. त्याचबरोबर दहा वर्षांपासून शरीरात असलेला स्टेन्टही यशस्वीरीत्या काढण्यात आला. या संपूर्ण शस्त्रक्रियेसाठी केवळ दोन टाके देण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती ठणठणीत असून त्याच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाली आहे.

ही शस्त्रक्रिया महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथील युरो विभागप्रमुख डॉ. हेमंत केळकर, डॉ. हर्षद चव्हाण, डॉ. श्रीकांत रेड्डी, डॉ. शुभम चौधरी, डॉ. आर.के. तिवारी, डॉ. सुष्मीता रे या तज्ज्ञांनी यशस्वी केली.

मूत्रमार्गातील स्टेन्ट हा कायमस्वरूपी उपचार नसतो. डॉक्टरांनी सांगितलेल्या कालावधीत तो काढणे किंवा बदलणे अत्यंत आवश्यक असते. स्टेन्ट काढण्यास विलंब झाल्यास त्यावर खडे तयार होणे, संसर्ग होणे तसेच मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम होण्यासारख्या गुंतागुंती उद्भवू शकतात. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर नियमित तपासणी करावी आणि डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
– डॉ. हर्षद चव्हाण, महादेव हॉस्पीटल जळगाव.


 

Next Post
७० वर्षीय वृद्धाच्या मुतखड्याची दोन टाक्यांत यशस्वी शस्त्रक्रिया

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेद्वारे इनग्विनल हर्नियावर प्रभावी उपचार

ताज्या बातम्या

७० वर्षीय वृद्धाच्या मुतखड्याची दोन टाक्यांत यशस्वी शस्त्रक्रिया
खान्देश

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेद्वारे इनग्विनल हर्नियावर प्रभावी उपचार

November 29, 2026
७० वर्षीय वृद्धाच्या मुतखड्याची दोन टाक्यांत यशस्वी शस्त्रक्रिया
खान्देश

७० वर्षीय वृद्धाच्या मुतखड्याची दोन टाक्यांत यशस्वी शस्त्रक्रिया

November 29, 2026
पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला कोयत्याचा धाक; १० हजारांचा मोबाइल लुटला
गुन्हे

पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला कोयत्याचा धाक; १० हजारांचा मोबाइल लुटला

November 29, 2026
कार झाडावर झालेल्या अपघातात शिवसेना कार्यकर्त्याचा मृत्यू ; बिल्दी धरणाजवळील घटना 
खान्देश

कार झाडावर झालेल्या अपघातात शिवसेना कार्यकर्त्याचा मृत्यू ; बिल्दी धरणाजवळील घटना 

November 29, 2026
रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या यावलमधील दोघे हद्दपार
खान्देश

रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या यावलमधील दोघे हद्दपार

November 29, 2026
एटीएसच्या नावाने शिक्षकाला ३२.४० लाखांचा चुना
गुन्हे

एटीएसच्या नावाने शिक्षकाला ३२.४० लाखांचा चुना

November 28, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add