• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महादेव रुग्णालयात ६० वर्षीय महिलेवर स्तनाच्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया

मॉडिफाइड रॅडिकल मॅस्टेक्टोमी पद्धतीने दीड तासात शस्त्रक्रिया; महिलेच्या प्रकृतीत सुधारणा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 26, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
महादेव रुग्णालयात ६० वर्षीय महिलेवर स्तनाच्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया

जळगाव, प्रतिनिधी : स्तनाच्या कर्करोगाचे वेळीच निदान आणि योग्य उपचार झाल्यास या आजारावर प्रभावीपणे मात करता येऊ शकते. याची प्रचिती महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये आली. छातीत गाठ आढळून आलेल्या ६० वर्षीय महिलेवर स्तनाच्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. तुषा चौधरी आणि डॉ. रोहित बुक्का यांनी ही शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या प्रकृतीत सुधारणा होत असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

संबंधित ६० वर्षीय महिलेला छातीमध्ये गाठ जाणवत होती. सुरुवातीला या गाठीकडे दुर्लक्ष न करता तिने वैद्यकीय सल्ला घेतला. महादेव रुग्णालयात आल्यानंतर डॉक्टरांनी तिची प्राथमिक तपासणी केली. आजाराचे नेमके स्वरूप समजून घेण्यासाठी एक्स-रे, सीटी स्कॅन तसेच सुईच्या साहाय्याने गाठीची तपासणी (बायोप्सी) करण्यात आली. या सर्व तपासण्यांच्या अहवालांचे निरीक्षण केल्यानंतर महिलेला स्तनाचा कर्करोग असल्याचे निदान झाले.आजाराचे स्वरूप आणि रुग्णाची शारीरिक स्थिती लक्षात घेऊन डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

आधुनिक पध्दतीने शस्त्रक्रिया..
त्यानुसार मॉडिफाइड रॅडिकल मॅस्टेक्टोमी या शस्त्रक्रिया पद्धतीचा अवलंब करण्यात आला. या शस्त्रक्रियेमध्ये कर्करोगग्रस्त स्तनाच्या ऊतींसह आवश्यकतेनुसार काखेतील लसिकाग्रंथींवरही उपचार केले जातात. डॉ. तुषार चौधरी आणि डॉ. रोहित बुक्का यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने ही शस्त्रक्रिया पूर्ण केली.सुमारे दीड तास चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती सुधारू लागली. डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर पुढील उपचार आणि निरीक्षण सुरू आहे. स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर योग्य वेळी उपचार घेणे महत्त्वाचे असते. छातीत किंवा स्तनात गाठ जाणवणे, स्तनाच्या आकारात बदल होणे, त्वचेवर बदल दिसणे किंवा स्तनाग्रातून असामान्य स्त्राव होणे अशी लक्षणे आढळल्यास तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

महादेव रुग्णालयात विविध आजारांवर आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उपचार आणि शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे जळगावसह परिसरातील रुग्णांना स्थानिक पातळीवरच दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यास मदत होत आहे.

महादेव रुग्णालयात सहा रुग्णांवर हर्नियाची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियामहादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सहा रुग्णांवर हर्नियाची दुर्बिणीद्वारे (लॅप्रोस्कोपिक) यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करण्यात येणार्‍या या शस्त्रक्रियांमुळे रुग्णांना उपचारांची सुविधा उपलब्ध होत आहे. याशिवाय रुग्णालयात दुर्बिणीद्वारे पित्ताशयातील खडे (गॉलस्टोन) आणि अपेंडिक्सच्या आजारावरील शस्त्रक्रिया मोफत करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.


 

ताज्या बातम्या

महादेव रुग्णालयात ६० वर्षीय महिलेवर स्तनाच्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

महादेव रुग्णालयात ६० वर्षीय महिलेवर स्तनाच्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया

November 26, 2026
थर्ड वर्ल्ड मेयर्स फोरम समिट-२०२६; महापौर दीपमाला काळे यांनी घेतले आधुनिक नागरी व्यवस्थापनाचे धडे
जळगाव जिल्हा

थर्ड वर्ल्ड मेयर्स फोरम समिट-२०२६; महापौर दीपमाला काळे यांनी घेतले आधुनिक नागरी व्यवस्थापनाचे धडे

November 26, 2026
जेडीसीसी बँक निवडणुकीतील अर्जांच्या घोळाची चौकशी करा; निवडणूक प्रक्रिया स्थगितची मागणी
खान्देश

जेडीसीसी बँक निवडणुकीतील अर्जांच्या घोळाची चौकशी करा; निवडणूक प्रक्रिया स्थगितची मागणी

November 25, 2026
जळगावच्या पाटील कुटुंबाला गुजरातमध्ये कालव्यात फेकले; तिघांचा मृत्यू, दोन मुले बेपत्ता
खान्देश

जळगावच्या पाटील कुटुंबाला गुजरातमध्ये कालव्यात फेकले; तिघांचा मृत्यू, दोन मुले बेपत्ता

November 25, 2026
कजगावमध्ये तरुणावर अज्ञातांकडून गोळीबार; हल्ल्यात गंभीर जखमी, परिसरात खळबळ
खान्देश

कजगावमध्ये तरुणावर अज्ञातांकडून गोळीबार; हल्ल्यात गंभीर जखमी, परिसरात खळबळ

November 25, 2026
अल्पवयीन मुलीस पळवले; तरुणास ३ वर्षे सश्रम कारावास
गुन्हे

अल्पवयीन मुलीस पळवले; तरुणास ३ वर्षे सश्रम कारावास

November 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add