• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या बाजारात अचानक काय घडलं?

दहा दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याने घेतली मोठी उसळी; चांदीच्या दरातही तेजी, ग्राहकांना बसणार दरवाढीचा फटका!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 23, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा
0
लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या बाजारात अचानक काय घडलं?

जळगाव, प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरत असलेल्या सोन्याच्या दराने अखेर सोमवारी अचानक उसळी घेतली आहे. तुलसी विवाहानंतर लग्नसराईचा हंगाम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या किमतीत १.१८ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली. त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या दरघसरणीला ब्रेक लागला आहे. विशेष म्हणजे, एकाच दिवसात दहा ग्रॅम सोन्याच्या दरात तब्बल १ हजार ४८० रुपयांची वाढ झाल्याने ग्राहकांना आता दागिन्यांच्या खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

शनिवारी सोन्याच्या दरात ४९ रुपयांची घसरण झाली होती. त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, सोमवारी सकाळी बाजार उघडताच सोन्याच्या दरात तेजी दिसून आली. सोन्याच्या एका ग्रॅममागे १४८ रुपयांची वाढ झाली असून, दहा ग्रॅममागे हा आकडा १ हजार ४८० रुपयांवर पोहोचला आहे. जीएसटीसह सोन्याचा दहा ग्रॅमचा भाव १ लाख ४६ हजार रुपयांवर गेला आहे.

तुलसी विवाहानंतर लग्नसराईला सुरुवात होत असल्याने बाजारात सोन्याच्या दागिन्यांना मागणी वाढण्याची शक्यता आहे. लग्नासाठी दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही दरवाढ काहीशी खर्चिक ठरू शकते. दरम्यान, सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही वाढ झाली असून, चांदीचा किलोचा भाव १ लाख ७५ हजार रुपयांवर पोहोचला आहे.

जळगावच्या सराफ बाजारात गेल्या १० ते १२ दिवसांत सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली होती. त्यामुळे सोने खरेदीसाठी अनुकूल संधी निर्माण झाल्याचे ग्राहकांना वाटत होते. मात्र, सोमवारी झालेल्या दरवाढीने या घसरणीला पूर्णविराम मिळाला आहे.

मेकिंग चार्जेस आणि जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅमचा भाव १ लाख ४६ हजार रुपये झाला आहे. त्यात १ हजार ४८० रुपयांची वाढ नोंदविण्यात आली. २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३३ हजार ८१८ रुपये असून, त्यात १ हजार ३५० रुपयांची वाढ झाली आहे. तर १८ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ९ हजार ४८८ रुपयांवर पोहोचला असून, त्यात १ हजार १०० रुपयांची वाढ झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून दर कमी होत असल्याने ग्राहकांकडून खरेदीसाठी प्रतीक्षा केली जात होती. मात्र, आता दर पुन्हा वाढू लागल्याने लग्नसराईच्या काळात सोन्याची खरेदी कशी राहणार, याकडे सराफ व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.

केवळ जळगावच्या सराफ बाजारातच नव्हे, तर वायदे बाजारातही सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाल्याचे चित्र आहे. वायदे बाजारात सोन्याच्या दरात २.२६ टक्क्यांची वाढ झाली असून, दहा ग्रॅमचा भाव १ लाख २५ हजार १३७ रुपयांवर पोहोचला आहे. हा दर मजुरी आणि जीएसटी वगळून आहे.

दुसरीकडे चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. वायदे बाजारात चांदीचा किलोचा भाव १ लाख ५३ हजार १२४ रुपये झाला असून, त्यात ३.५९ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. एकीकडे लग्नसराईचा हंगाम सुरू होत असताना दुसरीकडे सोने-चांदीच्या दरांनी घेतलेली उसळी ग्राहकांच्या खर्चात वाढ करणारी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात सराफ बाजारात खरेदीचा जोर किती राहतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


 

ताज्या बातम्या

लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या बाजारात अचानक काय घडलं?
खान्देश

लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या बाजारात अचानक काय घडलं?

November 23, 2026
कर्जबाजारीपणा आणि पीक नुकसानीच्या विवंचनेतून विदगावातील दिव्यांग शेतकऱ्याची आत्महत्या
खान्देश

कर्जबाजारीपणा आणि पीक नुकसानीच्या विवंचनेतून विदगावातील दिव्यांग शेतकऱ्याची आत्महत्या

November 23, 2026
प्रमोद वाणी यांना महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्कार
खान्देश

प्रमोद वाणी यांना महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्कार

November 23, 2026
नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन
कृषी

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

November 23, 2026
धावपटू अतुलसिंह हाडा यांना कांस्य पदक, संजय मोती द्वितीय : राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
क्रिडा

धावपटू अतुलसिंह हाडा यांना कांस्य पदक, संजय मोती द्वितीय : राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

November 23, 2026
मेंदू विकाराने त्रस्त २० वर्षीय तरुणीवर महादेव रुग्णालयात यशस्वी उपचार!
आरोग्य

मेंदू विकाराने त्रस्त २० वर्षीय तरुणीवर महादेव रुग्णालयात यशस्वी उपचार!

November 23, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add