जळगाव, प्रतिनिधी : येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भाजप वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद अण्णा वाणी (आहेर) यांना ‘महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

शेगाव येथील वर्धमान जैन सभागृहात २२ नोव्हेंबर रोजी आयोजित राज्यस्तरीय पर्यावरण परिषद २०२६ मध्ये मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. निसर्ग मित्र समिती, धुळे आणि मातृ-पितृ आचार्य स्मृती जागरण सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

वाणी हे विविध सामाजिक व वाहतूक संघटनांमध्ये पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तसेच कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनचे महाराष्ट्र कोअर कमिटी सदस्य व जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष म्हणूनही ते जबाबदारी सांभाळत आहेत.
त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.









