• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

व्यसन आणि आक्रमकतेच्या विळख्यातून किशोरवयीन मुलाची सुटका

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांच्या उपचारांना यश

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 21, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
व्यसन आणि आक्रमकतेच्या विळख्यातून किशोरवयीन मुलाची सुटका

जळगाव, प्रतिनिधी : किशोरवयात होणारे मानसिक बदल, भावनिक अस्थिरता आणि व्यसनाधीनता यांचा मुलांच्या वर्तनावर गंभीर परिणाम होऊ शकतो. अशाच प्रकारच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या बर्‍हाणपूर येथील १६ वर्षीय बालकावर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मानसोपचार विभागाने यशस्वी उपचार केले आहेत. चिडचिड करणे, घरातील सदस्यांना मारहाण करणे तसेच मद्य आणि गांजाच्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या या बालकाला महिनाभराच्या नियमित उपचारांनंतर आणि समुपदेशनानंतर सकारात्मक बदल जाणवू लागले.

उपचारांना बालकाने उत्तम प्रतिसाद दिल्याने त्याच्या मानसिक आरोग्यात लक्षणीय सुधारणा झाली आहे.
बर्‍हाणपूर येथील या बालकाच्या वर्तनात काही काळापासून बदल जाणवू लागले होते. लहानसहान कारणांवरून चिडचिड करणे, रागावर नियंत्रण न राहणे, घरातील व्यक्तींशी आक्रमकपणे वागणे आणि मारहाण करणे असे प्रकार वाढले होते. यासोबतच त्याला मद्य आणि गांजाचे व्यसनही जडले होते. त्यामुळे कुटुंबीय चिंतेत होते. बालकाच्या वर्तनातील बदलांचा त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर तसेच कौटुंबिक वातावरणावरही परिणाम होत होता.

अखेर कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मानसोपचार विभागात दाखल केले. येथील मानसोपचार तज्ज्ञांनी बालकाची सविस्तर तपासणी करून त्याच्या मानसिक स्थितीचे मूल्यांकन केले. त्याच्या वर्तनामागील कारणे, मानसिक लक्षणे आणि व्यसनाशी संबंधित बाबींचा अभ्यास करून उपचारांची दिशा निश्चित करण्यात आली. त्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने औषधोपचारांसोबतच नियमित समुपदेशनावर भर दिला.महिनाभराच्या उपचारादरम्यान बालकाच्या मानसिक स्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात आले. त्याच्याशी संवाद साधून त्याच्या मनातील भावना, विचार आणि अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच कुटुंबीयांनाही बालकाच्या मानसिक स्थितीची माहिती देत त्याच्याशी संयमाने आणि सकारात्मक पद्धतीने वागण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

उपचार आणि समुपदेशनाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे बालकाच्या वर्तनात हळूहळू सकारात्मक बदल दिसू लागले. चिडचिड आणि आक्रमकता कमी होण्यास मदत झाली आणि त्याने उपचारांना चांगला प्रतिसाद दिला. उपचारासाठी मानसोपचार विभागातील डॉ. हुमेद महाडिक, डॉ. हिमांशू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. फरीन सुरैय्या यांनी सहकार्य केले.

▪️या प्रकरणातून किशोरवयीन मुलांमधील मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता वेळीच तज्ज्ञांची मदत घेणे किती महत्त्वाचे आहे, हे अधोरेखित झाले आहे. मुलांच्या वर्तनात अचानक बदल होणे, सतत चिडचिड करणे, आक्रमकता वाढणे, एकलकोंडेपणा किंवा व्यसनाकडे कल वाढणे ही लक्षणे गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.
– डॉ. फरीन सुरैय्या, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.


 

ताज्या बातम्या

व्यसन आणि आक्रमकतेच्या विळख्यातून किशोरवयीन मुलाची सुटका
आरोग्य

व्यसन आणि आक्रमकतेच्या विळख्यातून किशोरवयीन मुलाची सुटका

November 21, 2026
पिंप्राळा-निमखेडी परिसरातील रस्ते व गटारींच्या विकासकामांना सुरुवात; पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
जळगाव जिल्हा

पिंप्राळा-निमखेडी परिसरातील रस्ते व गटारींच्या विकासकामांना सुरुवात; पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

November 21, 2026
केरळी महिला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदिरात २३ नोव्हेंबरपासून कार्तिक पौर्णिमा उत्सव
जळगाव जिल्हा

केरळी महिला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदिरात २३ नोव्हेंबरपासून कार्तिक पौर्णिमा उत्सव

November 21, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये दुर्बिणीद्वारे केली मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये दुर्बिणीद्वारे केली मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया

November 21, 2026
नोटा बदलण्याच्या बहाण्याने महिलेची १९ हजार ५०० रुपयांची फसवणूक
गुन्हे

नोटा बदलण्याच्या बहाण्याने महिलेची १९ हजार ५०० रुपयांची फसवणूक

November 21, 2026
१५४ वर्षांची परंपरा लाभलेल्या श्रीराम रथोत्सव आज ; सर्वत्र भाविक भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण
जळगाव जिल्हा

१५४ वर्षांची परंपरा लाभलेल्या श्रीराम रथोत्सव आज ; सर्वत्र भाविक भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

November 21, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add