• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोदावरी अभियांत्रिकीच्या आठ खेळाडूंची अ. भा. तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड!

जम्मू विद्यापीठात रंगणार राष्ट्रीय स्पर्धा; दि बाटू विद्यापीठाचे करणार प्रतिनिधित्व

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 19, 2026
in क्रिडा, खान्देश, जळगाव जिल्हा
0
गोदावरी अभियांत्रिकीच्या आठ खेळाडूंची अ. भा. तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड!

जळगाव, प्रतिनिधी : गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखत महाविद्यालयातील आठ खेळाडूंनी अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे. ही स्पर्धा ४ ते १२ डिसेंबर २०२६ या कालावधीत जम्मू विद्यापीठ, जम्मू येथे आयोजित करण्यात आली आहे. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत हे खेळाडू डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

निवड झालेल्या खेळाडूंमध्ये सायली पाटील (तृतीय वर्ष, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग), सोनम गुंजाळ (द्वितीय वर्ष, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग), तेजस पाटील (अंतिम वर्ष, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स), वैष्णवी साबळे (अंतिम वर्ष, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स),मयूर कोळी (अंतिम वर्ष, मेकॅनिकल इंजिनिअरिंग), तुषार पाटील (द्वितीय वर्ष, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स),साक्षी उबाळे (अंतिम वर्ष, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग) आणि निसर्गा पाटील (द्वितीय वर्ष, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स) यांचा समावेश आहे.या सर्व खेळाडूंनी आंतरविभागीय तलवारबाजी स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत आपली गुणवत्ता सिद्ध केली. त्यांच्या सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर त्यांना राष्ट्रीय स्पर्धेत विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.

एकाच महाविद्यालयातील आठ खेळाडूंची निवड होणे ही महाविद्यालयासाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे.या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, क्रीडा संचालक डॉ. जयंत जाधव, विभागप्रमुख आणि शिक्षकवृंद यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच आगामी राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून महाविद्यालयाचा व विद्यापीठाचा नावलौकिक वाढवावा, अशा शुभेच्छा दिल्या.

गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनीही खेळाडूंच्या या यशाचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले व आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


 

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकीच्या आठ खेळाडूंची अ. भा. तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड!
क्रिडा

गोदावरी अभियांत्रिकीच्या आठ खेळाडूंची अ. भा. तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड!

November 19, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये ८० वर्षीय वृद्धावर मेंदूची अतिजोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी
Uncategorized

महादेव हॉस्पिटलमध्ये ८० वर्षीय वृद्धावर मेंदूची अतिजोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी

November 19, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट संघासाठी २२ नोव्हेंबरला निवड चाचणी
क्रिडा

जळगाव जिल्हा क्रिकेट संघासाठी २२ नोव्हेंबरला निवड चाचणी

November 19, 2026
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीचे वर्चस्व; १२ जागांवर बिनविरोध विजय
खान्देश

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत ‘शेतकरी एकता पॅनेल’ मैदानात

November 19, 2026
कानबाईचे विसर्जन करतांना पाय घसरुन पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू
गुन्हे

एमबीबीएसच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्याचा वसतिगृहात मृत्यू

November 19, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

शिवाजीनगर गोळीबार प्रकरणी आसोदा शिवारातून तीन जणांच्या मुसक्या आवळल्या 

November 19, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add