• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महादेव हॉस्पिटलमध्ये ८० वर्षीय वृद्धावर मेंदूची अतिजोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 19, 2026
in Uncategorized, आरोग्य, जळगाव जिल्हा
0
महादेव हॉस्पिटलमध्ये ८० वर्षीय वृद्धावर मेंदूची अतिजोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी

जळगाव, प्रतिनिधी : मेंदूमध्ये रक्तस्राव होऊन मेंदूवर दबाव निर्माण झाल्याने गंभीर अवस्थेत असलेल्या ८० वर्षीय वृद्ध रुग्णावर महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे तातडीने करण्यात आलेली मेंदूची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. विशेष म्हणजे, शस्त्रक्रियेनंतर दुसर्‍याच दिवशी रुग्ण पूर्णपणे शुद्धीवर येऊन प्रतिसाद देऊ लागला. तसेच अवघ्या दोन दिवसांत रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

आता रुग्ण स्वतः चालण्यासही सक्षम झाला आहे.संबंधित वृद्ध रुग्णाला अचानक शरीराच्या उजव्या बाजूला अशक्तपणा येणे, बोलता न येणे, सूचनांना प्रतिसाद न देणे तसेच स्वतःहून डोळे उघडता न येणे अशा गंभीर स्वरूपाच्या तक्रारींसह महादेव हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

रुग्णाची तातडीने तपासणी केली असता सीटी ब्रेनमध्ये सबअ‍ॅक्यूट सबड्युरल हेमॅटोमा म्हणजेच मेंदूच्या आवरणाखाली रक्त साचल्याचे आणि त्यामुळे मेंदूवर दबाव निर्माण होऊन मेंदू मधोमध सरकल्याचे निदान झाले.रुग्णाची गंभीर अवस्था लक्षात घेता वेळ न दवडता आपत्कालीन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार एमसीएच न्यूरोसर्जन डॉ. अनिकेत पाटील यांनी डाव्या बाजूला फ्रंटो-टेम्पोरो-पॅरिएटल डिकंप्रेसिव्ह क्रॅनिएक्टॉमी करून साचलेले रक्त बाहेर काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या केली. या शस्त्रक्रियेसाठी न्यूरोसर्जरी सिनिअर रेसिडेंट डॉ. श्रुती खंडागळेे, जनरल सर्जरी रेसिडेंट डॉ. पोमेश यांनी सहकार्य केले.

भूलतज्ज्ञ म्हणून डॉ. बऱ्हाटे यांनी जबाबदारी सांभाळली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा झाली. दुसर्‍याच दिवशी रुग्ण शुद्धीवर येऊन व्यवस्थित प्रतिसाद देऊ लागला. त्यानंतर प्रकृती स्थिर झाल्याने दोन दिवसांत रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. विशेष म्हणजे, आता रुग्ण स्वतःच्या पायाने चालू शकत आहे.

या संपूर्ण शस्त्रक्रियेचा खर्च शासकीय योजनेअंतर्गत मोफत करण्यात आला. त्यामुळे गंभीर आजारावरील अत्याधुनिक न्यूरोसर्जरीचा लाभ रुग्णाला विनामूल्य मिळाला.महादेव हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांची तत्परता, अचूक निदान, वेळेत केलेली शस्त्रक्रिया आणि समन्वयपूर्ण वैद्यकीय सेवेमुळे एका ८० वर्षीय वृद्धाला नवजीवन मिळण्यास मदत झाली.


 

ताज्या बातम्या

महादेव हॉस्पिटलमध्ये ८० वर्षीय वृद्धावर मेंदूची अतिजोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी
Uncategorized

महादेव हॉस्पिटलमध्ये ८० वर्षीय वृद्धावर मेंदूची अतिजोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी

November 19, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट संघासाठी २२ नोव्हेंबरला निवड चाचणी
क्रिडा

जळगाव जिल्हा क्रिकेट संघासाठी २२ नोव्हेंबरला निवड चाचणी

November 19, 2026
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीचे वर्चस्व; १२ जागांवर बिनविरोध विजय
खान्देश

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत ‘शेतकरी एकता पॅनेल’ मैदानात

November 19, 2026
कानबाईचे विसर्जन करतांना पाय घसरुन पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू
गुन्हे

एमबीबीएसच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्याचा वसतिगृहात मृत्यू

November 19, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

शिवाजीनगर गोळीबार प्रकरणी आसोदा शिवारातून तीन जणांच्या मुसक्या आवळल्या 

November 19, 2026
जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन
कृषी

जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 19, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add