जळगाव, प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टचे माजी अध्यक्ष तथा मृदंग इंडिया जाहिरात संस्थेचे संचालक अनंत भोळे यांची रोटरी वर्ष २०२७-२८ करीता असिस्टंट गव्हर्नरपदी निवड करण्यात आली आहे. नियोजित डिस्ट्रीक्ट गव्हर्नर किशोर राठी यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली असून, या पदाच्या माध्यमातून ते जळगाव येथील रोटरी क्लब आणि डिस्ट्रीक्ट प्रशासन यांच्यात समन्वयाची भूमिका बजावणार आहेत.

अनंत भोळे यांनी यापूर्वी रोटरी संघटनेत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या आहेत. त्यांनी क्लबचे सचिव, अध्यक्ष, डिस्ट्रीक्टचे सहाय्यक सचिव आणि संचालक यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर काम करून आपल्या कार्यक्षमतेची चुणूक दाखवली आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल जळगाव परिसरातील विविध क्षेत्रांमधून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरीचे सामाजिक आणि सेवाकार्य अधिक जोमाने पुढे चालेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.








