• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आउट’; अवैध धंद्यांवर एकाच दिवशी धडक

गावठी दारूचे २० लाखांचे रसायन व मुद्देमाल नष्ट; १२४ गुन्हे दाखल, ४२ मोबाईल मूळ मालकांना परत

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 17, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
जळगाव पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आउट’; अवैध धंद्यांवर एकाच दिवशी धडक

जळगाव, प्रतिनिधी :जिल्ह्यातील अवैध धंदे, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या घटकांविरोधात जळगाव जिल्हा पोलीस दलाने १६ नोव्हेंबर रोजी ‘ऑपरेशन ऑल आउट’अंतर्गत व्यापक मोहीम राबविली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटेपासून जिल्हाभरात विशेष पथके तैनात करण्यात आली होती. या मोहिमेत गावठी हातभट्टी दारूविरोधात १२४ गुन्हे दाखल करून २० लाख ६७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून ११ लाख ६९ हजार ३५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

गावठी हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरोधात १२४ गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणांत १२० आरोपी निष्पन्न झाले. पोलिसांनी ५ हजार ७२५ लिटर गावठी दारू जप्त करून नष्ट केली. तसेच दारूनिर्मितीसाठी वापरण्यात येणारे २८ हजार ९७२ लिटर रसायन जप्त अथवा नष्ट करण्यात आले. या कारवाईतील मुद्देमालाची किंमत २० लाख ६७ हजार २०० रुपये आहे.

देशी-विदेशी दारूच्या अवैध विक्रीप्रकरणी आणखी १२ गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये १२ आरोपींवर कारवाई करून देशी दारूच्या ४२० आणि विदेशी दारूच्या २५ बाटल्या जप्त करण्यात आल्या. या मुद्देमालाची किंमत ६१ हजार ८०५ रुपये आहे.

जुगार कायद्यान्वये ४६ गुन्हे दाखल करून ६० जणांवर कारवाई करण्यात आली. या प्रकरणांत ९१ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शस्त्र अधिनियमान्वये दोन गुन्हे दाखल करून दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून दोन तलवारी जप्त करण्यात आल्या.

अंमली पदार्थांविरोधातील कारवाईत ११ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी १० प्रकरणे अंमली पदार्थ सेवनाशी संबंधित आहेत. या कारवाईत ११ आरोपींवर कारवाई करून ३ किलो २५० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. त्याची किंमत १ लाख ६२ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

वाहतूक शाखा आणि स्थानिक पोलिसांनी मोटार वाहन कायद्यान्वये जिल्हाभरात विशेष तपासणी मोहीम राबविली. मद्यप्राशन करून वाहन चालविण्याच्या ८७ प्रकरणांत कारवाई करण्यात आली. धोकादायक वाहन चालविण्याच्या कलम १८४ अंतर्गत सहा, कलम ६६/१९२ अंतर्गत ६३, विना हेल्मेट वाहन चालविण्याच्या १३३, तर महामार्गावर अनधिकृत पार्किंगच्या ६१ प्रकरणांत कारवाई करण्यात आली. याशिवाय मोटार वाहन कायद्यांतर्गत अन्य १ हजार ५७ प्रकरणे नोंदविण्यात आली. या सर्व कारवायांतून ११ लाख ६९ हजार ३५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

मोहिमेदरम्यान हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यावरही विशेष भर देण्यात आला. यात पाच महिला, सात पुरुष आणि पाच मुली अशा एकूण १७ जणांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. तसेच हरविलेले आणि चोरीस गेलेले मोबाईल शोधण्यासाठी CEIR पोर्टलचा वापर करण्यात आला. या माध्यमातून ४२ मोबाईल हस्तगत करून ते मूळ मालकांना परत करण्यात आले.

जिल्ह्यातील १९० भंगार दुकानांची तपासणी करण्यात आली. याप्रकरणी मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम १२४ अन्वये पाच गुन्हे दाखल करून संबंधितांवर कारवाई करण्यात आली. पानटपऱ्यांवर तंबाखू नियंत्रण कायद्यान्वये (COTPA) १०० गुन्हे दाखल करण्यात आले असून, २० हजार रुपयांचा दंड अथवा मुद्देमालाची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय १८० हॉटेल्स आणि लॉजेसची तपासणी करण्यात आली.

या मोहिमेत ५०७ सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ११ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. हद्दपारीचे आदेश असलेल्या आठ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १४२ अन्वये कारवाई करण्यात आली. तसेच ३७६ समन्स आणि १६१ वॉरंट बजावण्यात आले. मद्यप्राशन करून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या ७३ जणांविरुद्धही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा विशेष मोहिमा यापुढेही सुरू ठेवण्यात येतील, असा निर्धार जिल्हा पोलीस दलाने व्यक्त केला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, वाहतूक शाखा तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकांनी या मोहिमेत सहभाग घेतला.


 

ताज्या बातम्या

जळगाव पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आउट’; अवैध धंद्यांवर एकाच दिवशी धडक
गुन्हे

जळगाव पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आउट’; अवैध धंद्यांवर एकाच दिवशी धडक

November 17, 2026
भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; एकजुटीचा आणि हक्कांसाठी संघर्षाचा निर्धार
जळगाव जिल्हा

भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; एकजुटीचा आणि हक्कांसाठी संघर्षाचा निर्धार

November 17, 2026
उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा; महापौरांचे प्रशासनाला निर्देश
जळगाव जिल्हा

उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा; महापौरांचे प्रशासनाला निर्देश

November 16, 2026
डॉ. भरत बोरोले यांना राज्यस्तरीय ‘बेस्ट सेक्रेटरी’ पुरस्काराने गौरव
आरोग्य

डॉ. भरत बोरोले यांना राज्यस्तरीय ‘बेस्ट सेक्रेटरी’ पुरस्काराने गौरव

November 16, 2026
जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच वेळी तीन बंद घरांना केले लक्ष्य
गुन्हे

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच वेळी तीन बंद घरांना केले लक्ष्य

November 16, 2026
सरस्वती वहनाचे भक्तीमय स्वागत; मंत्री गिरीश महाजन यांची विशेष उपस्थिती
जळगाव जिल्हा

सरस्वती वहनाचे भक्तीमय स्वागत; मंत्री गिरीश महाजन यांची विशेष उपस्थिती

November 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add