जळगाव , प्रतिनिधी : आदिवासी समाजाचे आराध्य दैवत आणि महान क्रांतिकारी जननायक भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती रविवार, १५ नोव्हेंबर रोजी भाजप कार्यालय, जी. एम. फाउंडेशन येथे उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी सकाळी १० वाजता भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे (राजूमामा) आणि जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमात आमदार सुरेश भोळे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्याचा आणि संघर्षमय इतिहासाचा परिचय करून दिला. आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी केलेला संघर्ष, सामाजिक योगदान आणि ब्रिटिश सत्तेविरुद्ध उभारलेला क्रांतिकारी लढा यांचे स्मरण यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाला माजी अध्यक्षा उज्वला बेंडाळे, एस.टी. मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दीपक कोळी, संतोष इंगळे, उदय भालेराव, दीपक परदेशी, पितांबर भावसार, महेश चौधरी, नगरसेविका वैशाली पाटील, सागर पाटील, प्रमोद वाणी, चेतन शर्मा, खंबायत यांच्यासह एस.टी. मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








