• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जिल्ह्यात प्रथमच महादेव रुग्णालयात एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी यशस्वी!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 12, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
जिल्ह्यात प्रथमच महादेव रुग्णालयात एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी यशस्वी!

जळगाव, प्रतिनिधी : कंबरदुखी, पायात पसरणार्‍या तीव्र वेदना आणि चालणे-बसणेही कठीण करणार्‍या मणक्याच्या गंभीर आजारावर महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे अत्याधुनिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. जळगाव जिल्ह्यात प्रथमच एंडोस्कोपिक मोनोपोर्टल शस्त्रक्रिया करण्यात आली.

एका रुग्णाला गेल्या काही काळापासून तीव्र कंबरदुखी होती. त्यांच्या उजव्या पायापर्यंत वेदना पसरत होत्या. पायाला मुंग्या येणे, बधिरता जाणवणे, चालताना अडचण येणे तसेच वेदनेमुळे बसणेही अशक्य होत होते. या त्रासामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला होता. तपासणीसाठी त्या महादेव रुग्णालयात दाखल झाल्या.

याठिकाणी न्युरोसर्जन डॉ. अनिकेत पाटील, डॉ. अतुल जाधव, डॉ. विपूल राठोड यांच्या टीमकडून करण्यात आलेल्या एमआरआयद्वारे निदान झाले. १० नोव्हेंबर रोजी ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मणक्याच्या प्रभावित भागातील डिस्कचा नसांवर येणारा दाब कमी करण्याची प्रक्रिया करण्यात आली.

शस्त्रक्रियेनंतर दुसर्‍याच दिवशी म्हणजे ११ नोव्हेंबर रोजी रुग्णाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसून आली. कंबरदुखी आणि उजव्या पायात पसरणारी रॅडिक्युलर वेदना पूर्णपणे थांबली. रुग्णाला बसताना किंवा चालताना वेदना होत नसल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला. प्रकृती समाधानकारक असल्याने १२ नोव्हेंबर रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मणक्याच्या आजारांवरील आधुनिक एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया तंत्रज्ञानामुळे योग्य रुग्णांची तपासणी करून कमीत कमी आक्रमक पद्धतीने उपचार करण्याचा पर्याय उपलब्ध होत आहे.

महादेव रुग्णालयातील या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे जळगाव जिल्ह्यातील प्रगत मणक्याच्या उपचार सुविधांमध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण भर पडली आहे. शस्त्रक्रियेसाठी डॉ. प्रितम दास, डॉ. श्रृती खंडागळे, शस्त्रक्रिया सहाय्यक, परिचारीका यांनी सहकार्य केले.

एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी म्हणजे काय?
एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी ही आधुनिक दुर्बिणीद्वारे केली जाणारी मणक्याची शस्त्रक्रिया आहे. यामध्ये छोट्या छिद्रातून कॅमेरा आणि विशेष उपकरणे वापरून नसांवरील दाब दूर केला जातो. त्यामुळे स्नायूंचे नुकसान कमी होते, वेदना कमी होऊ शकतात आणि रुग्ण लवकर पूर्ववत होऊ शकतो. परंतु योग्य शस्त्रक्रिया निवडणे हे रुग्णाच्या एमआरआय तपासणी, आजाराचे स्वरूप आणि शल्यचिकित्सकाच्या अनुभवावर अवलंबून असते.


 

ताज्या बातम्या

जिल्ह्यात प्रथमच महादेव रुग्णालयात एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी यशस्वी!
आरोग्य

जिल्ह्यात प्रथमच महादेव रुग्णालयात एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी यशस्वी!

November 12, 2026
जनजातीय गौरव सेवा सप्ताहातून आदिवासींच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा – ना. गुलाबराव पाटील
जळगाव जिल्हा

जनजातीय गौरव सेवा सप्ताहातून आदिवासींच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा – ना. गुलाबराव पाटील

November 11, 2026
माणुसकीचा अनोखा उपक्रम…! वंचित मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद
जळगाव जिल्हा

माणुसकीचा अनोखा उपक्रम…! वंचित मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद

November 11, 2026
दुहेरी आघात: जावयाच्या अंत्यविधीची तयारी सुरू असताना प्रकृती ढासळल्याने सासूचीही प्राणज्योत मालवली
जळगाव जिल्हा

दुहेरी आघात: जावयाच्या अंत्यविधीची तयारी सुरू असताना प्रकृती ढासळल्याने सासूचीही प्राणज्योत मालवली

November 11, 2026
अनैतिक संबंधाच्या संशयातून झालेल्या खून प्रकरणातील आरोपीला काही तासांतच केले जेरबंद
गुन्हे

अनैतिक संबंधाच्या संशयातून झालेल्या खून प्रकरणातील आरोपीला काही तासांतच केले जेरबंद

November 10, 2026
रौप्यमहोत्सवी ‘पाडवा पहाट’ कार्यक्रमात शास्त्रीय संगीत व सुगम संगीताची पर्वणी
जळगाव जिल्हा

रौप्यमहोत्सवी ‘पाडवा पहाट’ कार्यक्रमात शास्त्रीय संगीत व सुगम संगीताची पर्वणी

November 10, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add