• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दिवाळी पाडव्याला महात्मा गांधी उद्यानात रंगणार ‘पाडवा पहाट’

आकाशवाणी जळगावच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त संगीत मैफल

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 5, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, सामाजिक
0
दिवाळी पाडव्याला महात्मा गांधी उद्यानात रंगणार ‘पाडवा पहाट’

जळगाव, प्रतिनिधी : दिवाळी पाडव्याच्या मंगलमय पहाटे अभंगवाणी, नाट्यगीते आणि सुगम संगीताची सुरेल मैफल अनुभवण्याची संधी जळगावकरांना मिळणार आहे. आकाशवाणी जळगावच्या ५० व्या वर्षपूर्तीनिमित्त आणि स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६ रोजी महात्मा गांधी उद्यानात ‘पाडवा पहाट’ या प्रातःकालीन संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठीक ६ वाजता होणार आहे.

आकाशवाणी जळगाव, स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आणि कै. नथ्थूशेट चांदसरकर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नाशिक येथील आणि आकाशवाणी जळगावचे मान्यताप्राप्त कलाकार या मैफिलीत सादरीकरण करणार आहेत.

या मैफिलीत आशिष रानडे, ईश्वरी दसक्कर कदडी आणि पूजा दसक्कर यांचे गायन होणार आहे. त्यांना तबल्यावर सुजित काळे, संवादिनीवर सुभाष दसक्कर, सिंथेसायझरवर विजय नेवे आणि ऑक्टोपॅडवर नितेश पाटील साथसंगत करणार आहेत. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन दीपिका घैसास करणार आहेत.

कार्यक्रमाला खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, आकाशवाणी जळगावचे कार्यक्रम प्रमुख ज्ञानेश्वर बोबडे, उद्योगपती अशोक जैन आणि कै. नथ्थूशेट चांदसरकर ट्रस्टचे मेजर नानासाहेब वाणी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाला भवरलाल अँड कांताबाई फाऊंडेशनचे सहकार्य लाभले आहे. ही मैफल आकाशवाणी जळगाववरून प्रसारित होणार असल्याने कार्यक्रम सकाळी ठीक ६ वाजता सुरू होईल. रसिकांनी कार्यक्रम सुरू होण्याच्या किमान १० मिनिटे आधी आसनस्थ व्हावे आणि या सुरेल मैफिलीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आकाशवाणी जळगाव, स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आणि चांदसरकर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.


 

Next Post
“वॉटर मीटर” मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक

"वॉटर मीटर" मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक

ताज्या बातम्या

स्वच्छता कामे, गटारीच्या विकासाच्या कामांना गती देण्याचे निर्देश
खान्देश

स्वच्छता कामे, गटारीच्या विकासाच्या कामांना गती देण्याचे निर्देश

November 5, 2026
कासोदा पोलिसांची दिवाळीपूर्वी नागरिकांना भेट; १० गहाळ मोबाईल परत
गुन्हे

कासोदा पोलिसांची दिवाळीपूर्वी नागरिकांना भेट; १० गहाळ मोबाईल परत

November 5, 2026
“वॉटर मीटर” मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक
खान्देश

“वॉटर मीटर” मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक

November 5, 2026
दिवाळी पाडव्याला महात्मा गांधी उद्यानात रंगणार ‘पाडवा पहाट’
खान्देश

दिवाळी पाडव्याला महात्मा गांधी उद्यानात रंगणार ‘पाडवा पहाट’

November 5, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला मोठी झेप! ‘डी प्लस’ दर्जानुसार विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने लागू
खान्देश

जळगावच्या औद्योगिक विकासाला मोठी झेप! ‘डी प्लस’ दर्जानुसार विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने लागू

November 4, 2026
“वॉटर मीटर” मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक
जळगाव जिल्हा

“वॉटर मीटर” मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक

November 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add