• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ज्येष्ठ पत्रकार धों.ज. गुरव यांना संपादक परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 2, 2026
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक, सामाजिक
0
ज्येष्ठ पत्रकार धों.ज. गुरव यांना संपादक परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

जळगाव, प्रतिनिधी : समाजातील घडामोडींचे केवळ वृत्तांकन करणे एवढेच पत्रकारितेचे कार्य नसून समाजाला योग्य दिशा देण्याची आणि लोकशाहीतील सजग प्रहरी म्हणून भूमिका बजावण्याची मोठी जबाबदारी पत्रकारितेवर आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून या स्तंभाची विश्वासार्हता टिकविण्यासाठी सत्य, निष्पक्षता आणि नैतिक मूल्यांची जपणूक करणे काळाची गरज आहे. बदलत्या काळात पत्रकारितेने आपली मूल्याधिष्ठित ओळख कायम ठेवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन खासदार स्मिता वाघ यांनी केले.

महाराष्ट्र संपादक परिषद, मुंबई यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार धों.ज. गुरव यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. जळगाव येथील गोदावरी फाऊंडेशनच्या सभागृहात आयोजित या सोहळ्यात खासदार श्रीमती वाघ बोलत होत्या. मानचिन्ह, शाल, धनादेश आणि वृक्षाचे रोप देऊन श्री. गुरव यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पत्रकारितेच्या क्षेत्रात दीर्घकाळ केलेल्या योगदानाचा हा सन्मान असून या निमित्ताने पत्रकारितेतील मूल्यांचा विचारही अधोरेखित झाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. व्यासपीठावर महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष प्रकाश कुलथे, परिषदेचे पदाधिकारी श्री. तावरे, गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ. केतकी पाटील, संपादिका शांता वाणी, नगरसेवक विशाल भोळे उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देतांना श्री. गुरव यांनी त्यांना आलेले विविध अनुभव कथन केले. संकट आले मात्र कधीही खचलो नाही, मी सत्याच्या बाजूने लिखाण केल्याने त्रास झाला मात्र डगमगलो नाही, शेवटी सत्य हे सुर्यप्रकाशासारखे उजळ असल्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. परिवारातील सदस्य व मित्रवर्ग यांनी नेहमीच साथ दिल्याने मी माझी पत्रकारीता सुरुच ठेवणार असून आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर आत्मचरित्र लिहिण्यास सुरुवात करतो असेही ते म्हणाले.

याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ. केतकी पाटील, राजेश यावलकर, ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांनी मनोगत व्यक्त केले. या सोहळ्याला विविध दैनिकांचे संपादक, राजजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

Next Post
चारा टंचाईवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा : डॉ. प्रदीप झोड

चारा टंचाईवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा : डॉ. प्रदीप झोड

ताज्या बातम्या

महापौर दीपमाला काळेंचा वॉर्ड १६ मध्ये स्वच्छतेचा धडाका; दुकानदारांना घेतले फैलावर
जळगाव जिल्हा

महापौर दीपमाला काळेंचा वॉर्ड १६ मध्ये स्वच्छतेचा धडाका; दुकानदारांना घेतले फैलावर

November 2, 2026
वरणगावात गोळीबारचा थरार; मुक्ताईनगरचा तरुण गंभीर
गुन्हे

वरणगावात गोळीबारचा थरार; मुक्ताईनगरचा तरुण गंभीर

November 2, 2026
डॉ. स्नेहल फेगडे, डॉ. रोहन पाटील यांची असोसिएशन ऑफ सर्जन्स इंडियाच्या राज्य कार्यकारिणीवर निवड
आरोग्य

डॉ. स्नेहल फेगडे, डॉ. रोहन पाटील यांची असोसिएशन ऑफ सर्जन्स इंडियाच्या राज्य कार्यकारिणीवर निवड

November 2, 2026
‘नेक्सस २के २६’ फ्रेशर्स सोहळा उत्साहात संपन्न; गौरव भोई ठरला ‘मि. फ्रेशर’, तर कुमुदिनी महाजन ‘मिस फ्रेशर’
जळगाव जिल्हा

‘नेक्सस २के २६’ फ्रेशर्स सोहळा उत्साहात संपन्न; गौरव भोई ठरला ‘मि. फ्रेशर’, तर कुमुदिनी महाजन ‘मिस फ्रेशर’

November 2, 2026
चारा टंचाईवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा : डॉ. प्रदीप झोड
Uncategorized

चारा टंचाईवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा : डॉ. प्रदीप झोड

November 2, 2026
ज्येष्ठ पत्रकार धों.ज. गुरव यांना संपादक परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
जळगाव जिल्हा

ज्येष्ठ पत्रकार धों.ज. गुरव यांना संपादक परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

November 2, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add