जळगाव, प्रतिनिधी : जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे खुल्या बुद्धिबळ निवड स्पर्धेचे आयोजन उद्या दिनांक २५ ऑक्टोबर रविवार रोजी सकाळी १०.०० वाजता कांताई सभागृह येथे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील पहिल्या चार विजेत्या खेळाडूंची निवड ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधी वसई येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी जिल्हा संघात खेळाडूंची निवड करण्यात येईल.

स्पर्धेतील प्रथम दहा खेळाडूंना रोख पारितोषिके देण्यात येतील.
तसेच वयोगट ९,११,१३,१५ पहिल्या तीन खेळाडूंना मेडल देऊन गौरवण्यात येईल.

स्पर्धेसाठी खेळाडूंनी आपली नावे कांताई सभागृह येथे परेश देशपांडे प्रवीण ठाकरे यांच्याकडे नोंदवावी. स्पर्धेत अधिकाधिक खेळाडूंनी भाग घ्यावा असे आवाहन जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.









