• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेजची गोदावरी व टेक्नोडिया इंडस्ट्रीजला औद्योगिक भेट

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 23, 2026
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेजची गोदावरी व टेक्नोडिया इंडस्ट्रीजला औद्योगिक भेट

जळगाव, प्रतिनिधी : गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन, जळगाव येथील विद्यार्थिनींसाठी गोदावरी इंडस्ट्रीज आणि टेक्नोडिया इंडस्ट्रीज येथे औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले. वर्गात मिळवलेल्या सैद्धांतिक ज्ञानाची प्रत्यक्ष औद्योगिक कामकाजाशी सांगड घालणे, विद्यार्थिनींचा आत्मविश्वास वाढविणे आणि औद्योगिक क्षेत्रातील करिअरच्या संधींची ओळख करून देणे, हा या भेटीचा मुख्य उद्देश होता.

या भेटीदरम्यान विद्यार्थिनींनी विविध उत्पादन प्रक्रियांची प्रत्यक्ष पाहणी केली. गोदावरी इंडस्ट्रीजमध्ये इलेक्ट्रिकल एमसीबी (चउइ) निर्मिती, विविध घटकांचे उत्पादन, असेंब्ली आणि वेल्डिंग प्रक्रियेची माहिती त्यांना देण्यात आली. तसेच पिव्होट पिन असेंब्ली, थर्मल लाईन आणि मॅग्नेटिक लाईनवरील घटकांच्या निर्मिती प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करण्यात आले.आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देताना ईव्ही चार्जर्सचे उत्पादन तसेच चारचाकी वाहनांसाठी एसी टू डीसी चार्जर्सच्या निर्मिती प्रक्रियेचीही माहिती विद्यार्थिनींनी जाणून घेतली. प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेचे निरीक्षण केल्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील तांत्रिक बाबी आणि कामकाजाची पद्धत समजून घेण्याची संधी त्यांना मिळाली.

यावेळी गोदावरी व टेक्नोडिया इंडस्ट्रीजचे प्लांट डायरेक्टर चेतन नारखेडे, प्लांट हेड प्रविण येवले आणि सुपरवायझर हर्षल सोनवणे यांनी विद्यार्थिनींना विविध उत्पादन प्रक्रिया आणि तांत्रिक बाबींची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थिनींच्या प्रश्नांचे निरसन करून त्यांना मोलाचे मार्गदर्शनही केले.

या औद्योगिक भेटीचे आयोजन महाविद्यालयाच्या इंडस्ट्रियल इंटरॅक्शन अँड व्हिजिट कमिटीच्या समन्वयक प्रा. मानसी अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना प्रत्यक्ष औद्योगिक वातावरणाचा अनुभव मिळाला असून, त्यांच्या व्यावहारिक ज्ञानात आणि तांत्रिक समजुतीत मोलाची भर पडली आहे.


 

Next Post
दिक्षारंभ कार्यक्रमांतर्गत कृषी विद्यार्थ्यांची जैन हिल्सला शैक्षणिक भेट

दिक्षारंभ कार्यक्रमांतर्गत कृषी विद्यार्थ्यांची जैन हिल्सला शैक्षणिक भेट

ताज्या बातम्या

‘स्टार सिनेमा’मध्ये आणखी दोन अत्याधुनिक स्क्रीन सज्ज; प्रेक्षकांसाठी मल्टिप्लेक्सचा विस्तार
जळगाव जिल्हा

‘स्टार सिनेमा’मध्ये आणखी दोन अत्याधुनिक स्क्रीन सज्ज; प्रेक्षकांसाठी मल्टिप्लेक्सचा विस्तार

October 24, 2026
जळगाव जिल्हा खुल्या बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेचे उद्या आयोजन
क्रिडा

जळगाव जिल्हा खुल्या बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेचे उद्या आयोजन

October 24, 2026
सीए पराग जैन यांना पीएच.डी. पदवी ; खाद्यप्रक्रिया उद्योगांतील परवाना प्रक्रियेवर संशोधन
खान्देश

सीए पराग जैन यांना पीएच.डी. पदवी ; खाद्यप्रक्रिया उद्योगांतील परवाना प्रक्रियेवर संशोधन

October 24, 2026
उधार पान-सिगारेट दिले नाही म्हणून कोयता-तलवारीने हल्ला;  तीन हल्लेखोरांना 12 तासांमध्ये बेड्या
खान्देश

उधार पान-सिगारेट दिले नाही म्हणून कोयता-तलवारीने हल्ला;  तीन हल्लेखोरांना 12 तासांमध्ये बेड्या

October 24, 2026
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीची घोषणा! विद्यमान चेअरमन सह दहा संचालक निवडणुकी बाहेर
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीची घोषणा! विद्यमान चेअरमन सह दहा संचालक निवडणुकी बाहेर

October 24, 2026
अनुभूती बालनिकेतन व माणुसकी सेवा फाउंडेशनतर्फे बालदिनानिमित्त बालकांच्या कलागुणांना मिळणार हक्काचे व्यासपीठ!
Uncategorized

अनुभूती बालनिकेतन व माणुसकी सेवा फाउंडेशनतर्फे बालदिनानिमित्त बालकांच्या कलागुणांना मिळणार हक्काचे व्यासपीठ!

October 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add