• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दुर्दैवी! बैलांना पाणी पाजताना पाय घसारला अन्…; वाघूर नदीत बुडलेल्या वृद्धाचा २४ तासांनंतर सापडला मृतदेह

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 6, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
दुर्दैवी! बैलांना पाणी पाजताना पाय घसारला अन्…; वाघूर नदीत बुडलेल्या वृद्धाचा २४ तासांनंतर सापडला मृतदेह

दुर्दैवी! बैलांना पाणी पाजताना पाय घसारला अन्…; वाघूर नदीत बुडलेल्या वृद्धाचा २४ तासांनंतर सापडला मृतदेह
​
जळगाव : मौजे कळगावजवळील वाघूर नदीच्या पात्रात बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेले ६० वर्षीय शेतकरी अरुण माधव कोळी यांचा पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्दैवी अंत झाला. सोमवारी सकाळी घडलेल्या या घटनेनंतर २४ तासांच्या अथक शोधानंतर मंगळवारी सकाळी अग्निशमन दलाच्या पथकाला त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. पाण्याखालील दाट झाडीत मृतदेह अडकल्याने बचाव पथकाला अत्यंत खडतर परिस्थितीचा सामना करावा लागला.

https://khandeshprabhat.com/wp-content/uploads/2026/10/VID-20261006-WA0209.mp4

​नेमकं काय घडलं?
सोमवारी, ५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास अरुण कोळी हे नेहमीप्रमाणे आपल्या बैलांना घेऊन वाघूर नदीवर गेले होते. बैलांना पाणी पाजत असताना अचानक त्यांचा पाय घसरला नि ते खोल पाण्यात ओढले गेले. पाण्याचा वेग जास्त असल्याने क्षणात ते दिसेनासे झाले. उपस्थितांनी तातडीने आरडाओरड केली, पण तोपर्यंत उशीर झाला होता. सकाळी १० वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत जळगाव मनपा अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली.

​अग्निशमन दलाचे थरारक आणि आव्हानात्मक प्रयत्न
माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ आणि जळगाव मनपा अग्निशमन केंद्र अधिकारी भारत बारी यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. मंगळवारी सकाळी पुन्हा अग्निशमन दलाच्या पथकाने रबर बोटीच्या साहाय्याने वाघूर नदीपात्रात कसून शोध घेतला. यावेळी नदीच्या तळाशी असलेल्या दाट झाडीत अरुण कोळी अडकलेल्या अवस्थेत आढळले. पाण्याखालील झाडांमुळे मृतदेह बाहेर काढताना पथकाची मोठी कसरत झाली; मात्र जवानांनी जीवाची पर्वा न करता अथक प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढला.

​या  कर्मचाऱ्यांनी राबवली शोधमोहीम
या कठीण आणि आव्हानात्मक शोधकार्यात अग्निशमन दल व बचाव पथकाच्या टीम प्रमुख प्रकाश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली देविदास सुरवाडे, प्रदीप धनगर, सौरभ चिकटे, योगेश पाटील, किरण महाजन, महेंद्र कोळी आणि बांभोरी येथील विकास सोनवणे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. या सर्व ८ कर्मचाऱ्यांनी दाखवलेले धैर्य आणि सहकार्यामुळेच २४ तासांनंतर हा शोध यशस्वी होऊ शकला.

​शोधकार्य पूर्ण झाल्यानंतर अरुण कोळी यांचा मृतदेह तलाठी, पोलीस पाटील व ग्रामस्थांच्या ताब्यात देण्यात आला. बचाव पथकाने दाखवलेल्या तत्परतेबद्दल आणि कौशल्याबद्दल कळगावच्या ग्रामस्थांकडून सर्व कर्मचाऱ्यांचे मनापासून कौतुक केले जात आहे.

Next Post
आमदार राजूमामा भोळे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत

आमदार राजूमामा भोळे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत

ताज्या बातम्या

निर्माणाधीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कामाची मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी केली पाहणी
खान्देश

निर्माणाधीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कामाची मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी केली पाहणी

October 6, 2026
आमदार राजूमामा भोळे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत
जळगाव जिल्हा

आमदार राजूमामा भोळे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत

October 6, 2026
दुर्दैवी! बैलांना पाणी पाजताना पाय घसारला अन्…; वाघूर नदीत बुडलेल्या वृद्धाचा २४ तासांनंतर सापडला मृतदेह
गुन्हे

दुर्दैवी! बैलांना पाणी पाजताना पाय घसारला अन्…; वाघूर नदीत बुडलेल्या वृद्धाचा २४ तासांनंतर सापडला मृतदेह

October 6, 2026
सेवा संकल्प अभियानातून आदिवासी महिलांना उद्योजकतेची दिशा
कृषी

सेवा संकल्प अभियानातून आदिवासी महिलांना उद्योजकतेची दिशा

October 6, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार
कृषी

महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार

October 6, 2026
परधाडे-पाचोरा दरम्यान रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू
गुन्हे

परधाडे-पाचोरा दरम्यान रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू

October 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add