• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रेल्वे स्थानकावर प्रकृती खालावली अन् बांगलादेशी महिलेचे बिंग फुटले

तीन महिने जयपूरमध्ये वास्तव्य; जळगावात उपचारादरम्यान पोलिसांना संशय, जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 5, 2026
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव, प्रतिनिधी : जळगाव रेल्वे स्थानकावर अचानक प्रकृती खालावल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेली मो. अकिजारा अख्तर मो. अबछार (२५, रा. गारचर युनियन, जि. जमालपूर, बांगलादेश) ही महिला बांगलादेशी नागरिक असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात इमिग्रेशन कायदा तसेच परदेशी नागरिक कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मो. अकिजारा अख्तर या महिलेला १ ऑक्टोबरपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचे बोलणे आणि भाषा यावरून पोलिसांना संशय आला. याबाबत पोलिसांनी जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना माहिती दिली. त्यांच्या सूचनेनुसार जिल्हापेठ पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेने अधिक चौकशी सुरू केली.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत सदर महिला बांगलादेशातील रहिवासी असल्याचे समोर आले. ३ ऑक्टोबर रोजी तिला ताब्यात घेऊन शासकीय आशादीप महिला वसतिगृहात दाखल करण्यात आले. त्यानंतर ४ ऑक्टोबर रोजी तिचा जबाब नोंदविण्यात आला. त्यातून तिच्या भारतातील वास्तव्याबाबतची माहिती पोलिसांच्या हाती आली.

पोलिस तपासानुसार, अकिजारा अख्तर ही घटस्फोटित असून तिचे भाऊ व इतर नातेवाईक बांगलादेशात राहतात. एका मैत्रिणीच्या माध्यमातून तिची भारतात वास्तव्यास असलेल्या एका बांगलादेशी महिलेशी ओळख झाली. ही महिला जयपूर येथे राहत असून अकिजारा तिला ‘मावशी’ म्हणून संबोधत असल्याचे तपासात समोर आले आहे.

या महिलेने अकिजाराला भारतात आणण्यासाठी तिच्या घरापर्यंत रिक्षा पाठवली. त्यानंतर ती रिक्षाने भारत-बांगलादेश सीमेपर्यंत आली आणि तेथून भारतात प्रवेश केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. पश्चिम बंगालमार्गे ती जयपूर येथे पोहोचली आणि त्यानंतर सुमारे तीन महिने जयपूरमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांनी मिळवली आहे.

जयपूरमध्ये राहणाऱ्या या महिलेने फिरण्यासाठी घेऊन जाण्याच्या बहाण्याने अकिजाराला रेल्वेने प्रवासाला नेले. मात्र, जळगाव रेल्वे स्थानकावर तिची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, तिच्यासोबत असलेली मावशी तेथून पसार झाली. तिचा मोबाईलही सोबत घेऊन गेल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल वाघ करीत आहेत.

Next Post
एमडी ड्रग्जचा ‘किंगपीन’ अज्जू मालेगाव पोलिसांच्या रडारवर ; अजय गारुंगेला पुरवठा केल्याचे चौकशीत उघड

एमडी ड्रग्जचा ‘किंगपीन’ अज्जू मालेगाव पोलिसांच्या रडारवर ; अजय गारुंगेला पुरवठा केल्याचे चौकशीत उघड

ताज्या बातम्या

जिवंतपणी ज्येष्ठांची सेवा हेच महापुण्य; मातोश्री यमुनाई वृद्धाश्रमात साहित्याचे मोफत वाटप
जळगाव जिल्हा

जिवंतपणी ज्येष्ठांची सेवा हेच महापुण्य; मातोश्री यमुनाई वृद्धाश्रमात साहित्याचे मोफत वाटप

October 5, 2026
५८व्यांदा रक्तदान करून पै. शिवाजी पाटील यांनी जपली सामाजिक बांधिलकी
Uncategorized

५८व्यांदा रक्तदान करून पै. शिवाजी पाटील यांनी जपली सामाजिक बांधिलकी

October 5, 2026
एमडी ड्रग्जचा ‘किंगपीन’ अज्जू मालेगाव पोलिसांच्या रडारवर ; अजय गारुंगेला पुरवठा केल्याचे चौकशीत उघड
खान्देश

एमडी ड्रग्जचा ‘किंगपीन’ अज्जू मालेगाव पोलिसांच्या रडारवर ; अजय गारुंगेला पुरवठा केल्याचे चौकशीत उघड

October 5, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
खान्देश

रेल्वे स्थानकावर प्रकृती खालावली अन् बांगलादेशी महिलेचे बिंग फुटले

October 5, 2026
आजोबांच्या वर्षश्राद्धासाठी बहिणीला घेण्यासाठी निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू
खान्देश

आजोबांच्या वर्षश्राद्धासाठी बहिणीला घेण्यासाठी निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू

October 5, 2026
महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद
कृषी

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद

October 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add