• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 3, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, राजकीय
0
आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

जळगाव, प्रतिनिधी : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल आणि जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘जिल्हा वार्षिक योजना (आदिवासी उप-योजना) अंतर्गत योजनांच्या सामाजिक परिणामांचे विश्लेषण’ या संशोधन प्रकल्पाच्या अहवालाचे प्रकाशन आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते येथील शासकीय विश्रामगृहात नुकतेच करण्यात आले.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या संशोधन प्रकल्पात, चोपडा, यावल आणि रावेर तालुक्यांतील ८७ पेसा गावांमधील एकूण ९,८९८ कुटुंबांचे सर्वेक्षण करून शासकीय योजनांची परिणामकारकता, लाभार्थ्यांना झालेला प्रत्यक्ष लाभ, सामाजिक व आर्थिक बदल, शिक्षण, रोजगार, उपजीविका, मूलभूत सुविधा तसेच महिला व युवकांचा सहभाग यांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासाच्या आधारे योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सूचना व शिफारशी या अहवालात मांडण्यात आल्या आहेत.

यावेळी ‘आदिमित्र’ प्रकल्पाबाबतही मंत्री प्रा. डॉ. अशोक वुईके यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. संशोधनातून प्राप्त वस्तुनिष्ठ निष्कर्षांचा उपयोग आदिवासी विकासाच्या योजनांचे नियोजन, अंमलबजावणी व मूल्यमापन अधिक प्रभावी करण्यासाठी होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

प्रकाशनप्रसंगी प्रकल्प अधिकारी अरुण पवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे तसेच विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे प्रशाळेचे संचालक डॉ. उमेश गोगडिया, डॉ. प्रशांत सोनवणे, सहायक प्रा. विनेश पावरा व सहायक प्रा. विरेश पाटील उपस्थित होते.

Next Post
मुंबई WIRC टीमची जळगाव सीए शाखेला भेट

मुंबई WIRC टीमची जळगाव सीए शाखेला भेट

ताज्या बातम्या

एसआयआर प्रक्रियेत कागदपत्रे सादर करण्याची सुविधा
खान्देश

एसआयआर प्रक्रियेत कागदपत्रे सादर करण्याची सुविधा

October 3, 2026
मुंबई WIRC टीमची जळगाव सीए शाखेला भेट
खान्देश

मुंबई WIRC टीमची जळगाव सीए शाखेला भेट

October 3, 2026
आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन
खान्देश

आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

October 3, 2026
रिक्षात बसवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविणारे तिघे जेरबंद
खान्देश

रिक्षात बसवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविणारे तिघे जेरबंद

October 2, 2026
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटने’तर्फे मानवंदना
जळगाव जिल्हा

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटने’तर्फे मानवंदना

October 2, 2026
विकास दूध फेडरेशनमध्ये विद्यार्थ्यांनी अनुभवले आधुनिक ऑटोमेशनचे धडे
जळगाव जिल्हा

विकास दूध फेडरेशनमध्ये विद्यार्थ्यांनी अनुभवले आधुनिक ऑटोमेशनचे धडे

October 2, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add