• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई: दुचाकी चोरट्याला अटक, चोरीची मोटरसायकल हस्तगत

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 27, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई: दुचाकी चोरट्याला अटक, चोरीची मोटरसायकल हस्तगत

​जळगाव, (प्रतिनिधी) : शहर परिसरातील अजंठा चौफुली येथील इदगाह कॉम्प्लेक्स समोरून चोरीला गेलेली दुचाकी शोधण्यात एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. या प्रकरणी एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरीची ‘स्प्लेंडर प्लस’ दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, शेरा चौक, रझा कॉलनी (मेहरून) येथील रहिवासी फिर्यादी रमजान खान बाबू खान यांनी आपली दुचाकी (क्र. MH-19 DY 4874) १२ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ९:०० वाजेच्या सुमारास जळगाव-अजंठा चौफुली येथील इदगाह कॉम्प्लेक्ससमोर लावली होती. वैयक्तिक काम आटोपून परत आले असता त्यांना आपली दुचाकी त्या ठिकाणी दिसून आली नाही. याप्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

​गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपीचा शोध घेतला. दरम्यान पोलिसांनी तुळशीराम काल्यासिंग कासदे (वय २८, मूळ रा. झाकस, जि. बैतुल, मध्य प्रदेश; सध्या रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) याला ताब्यात घेतले.

​पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरी गेलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक प्रदिप चौधरी करत आहेत.

​ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे व पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोउनि चंद्रकांत धनके, ग्रै.पो.उप.निरी. विजयसिंग पाटील, पो.ना. प्रदिप चौधरी, पो.कॉ. रमाकांत साळुंखे, पो.कॉ. शशिकांत मराठे आणि पो.कॉ. योगेश घुगे यांच्या पथकाने पार पाडली.


 

Next Post
सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: १६ संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: १६ संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीचे वर्चस्व; १२ जागांवर बिनविरोध विजय
खान्देश

जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी ९७.०६ टक्के मतदान; १३ केंद्रांवर १०० टक्के मतदानाची नोंद

November 29, 2026
७० वर्षीय वृद्धाच्या मुतखड्याची दोन टाक्यांत यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेद्वारे इनग्विनल हर्नियावर प्रभावी उपचार

November 29, 2026
७० वर्षीय वृद्धाच्या मुतखड्याची दोन टाक्यांत यशस्वी शस्त्रक्रिया
खान्देश

७० वर्षीय वृद्धाच्या मुतखड्याची दोन टाक्यांत यशस्वी शस्त्रक्रिया

November 29, 2026
पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला कोयत्याचा धाक; १० हजारांचा मोबाइल लुटला
गुन्हे

पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला कोयत्याचा धाक; १० हजारांचा मोबाइल लुटला

November 29, 2026
कार अपघातात शिवसेना कार्यकर्त्याचा मृत्यू ; बिल्दी धरणाजवळील घटना 
खान्देश

कार अपघातात शिवसेना कार्यकर्त्याचा मृत्यू ; बिल्दी धरणाजवळील घटना 

November 29, 2026
रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या यावलमधील दोघे हद्दपार
खान्देश

रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या यावलमधील दोघे हद्दपार

November 29, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add