• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: १६ संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 29, 2026
in जळगाव जिल्हा, मनोरंजन
0
सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: १६ संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

जळगाव, प्रतिनिधी : केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित ललित कला संवर्धिनी व गोदावरी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवार दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी सावदा येथील डॉ उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल येथे भव्य भुलाबाई महोत्सव उत्साहात संपन्न झाला. यात तीन गटातून १६ संघानी सहभाग नोंदवित भुलाबाईच्या पारंपरिक गीतांना आधुनिकतेची जोड देऊन विविध संदेश देण्याचा प्रयत्न संघांनी केला.

गोदावरी फौंडेशन संचलित डॉ उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कुल प्रांगणात आयोजित भुलाबाई महोत्सवाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य भारती महाजन होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून साई प्रसाद पुस्तकालयाच्या शुभांगी आखाडे, निकिता जाधव, पल्लवी निकुंभ ह्या उपस्थित होत्या. स्पर्धेचे परीक्षण केशव स्मृती प्रतिष्ठानच्या डॉ. पूजा महाजन, देवयानी कोल्हे, कोरिओग्राफर सचिन भिडे यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला गोदावरी फॉउंडेशनच्या प्रेरणास्थान स्व. गोदावरी पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भुलाबाईच्या मूर्तिचे पूजन करून आरती केली. सावदा येथे तालुकास्तरीय भुलाबाई महोत्सवाचे यंदाचे दुसरे दुसरे वर्ष असून महोत्सवात विविध गावातील लहान मोठ्या शाळांनी सहभाग नोंदविला.

याप्रसंगी नगरसेविका रेखा वानखेडे, प्रतीक्षा भंगाळे, भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षा रेखा बोंडे, फैजपूर च्या नगरसेविका जयश्री चौधरी, रावेर महिला मोर्चा अध्यक्षा आशा कोळी, बेटी बचाव बेटी पढाव च्या संयोजिका सारिका चव्हाण, नंदिनी पंत, रावेर च्या नगरसेविका अर्चना पाटील यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक, बक्षीस वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता खाचणे यांनी तर आभार रेखा बोंडे यांनी मानले.

असे होते गट..
पहिला लहान गट ३ ते १० वर्षे, मोठा गट ११ ते १६ आणि तिसरा खुला गट १७ वर्षांपासून पुढील मुली, महिला सहभागी झाल्या होत्या. सहभागी सर्व संघाना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

स्पर्धेचा अंतिम निकाल
लहान गट
प्रथम क्रमांक: मायक्रो व्हिजन अकॅडमी, रावेर
द्वितीय क्रमांक: जि. प. शाळा, वडगाव
तृतीय क्रमांक: जि. प. शाळा, वाघोदा
उत्तेजनार्थ: शिक्षण प्रसारक मंडळ प्राथमिक विद्या मंदिर, न्हावी

मोठा गट
प्रथम क्रमांक: डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मिडियम स्कूल, सावदा
द्वितीय क्रमांक: मायक्रो व्हिजन अकॅडमी, रावेर
तृतीय क्रमांक: उमरेश्वर माध्यमिक विद्यालय, दसनूर
उत्तेजनार्थ: भारत विद्यालय, न्हावी

खुला गट
प्रथम क्रमांक: भारत विद्यालय, न्हावी
द्वितीय क्रमांक: शिवकन्या मंडळ, साकळी (ता. यावल)
उत्तेजनार्थ: रोकडोबा हनुमान मंदिर मंडळ, कोचूर


 

ताज्या बातम्या

सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: १६ संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला
जळगाव जिल्हा

सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: १६ संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

September 29, 2026
एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई: दुचाकी चोरट्याला अटक, चोरीची मोटरसायकल हस्तगत
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई: दुचाकी चोरट्याला अटक, चोरीची मोटरसायकल हस्तगत

September 27, 2026
एरंडोलच्या टोळीतील तिघांना जिल्हाबंदी
गुन्हे

एरंडोलच्या टोळीतील तिघांना जिल्हाबंदी

September 24, 2026
घरमालक बाहेर जाताच मोलकरणीने लांबविले ५५ हजारांचे दागिने
गुन्हे

घरमालक बाहेर जाताच मोलकरणीने लांबविले ५५ हजारांचे दागिने

September 24, 2026
ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर
गुन्हे

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार

September 24, 2026
दुष्काळसदृश्य परिस्थितीत पिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
जळगाव जिल्हा

दुष्काळसदृश्य परिस्थितीत पिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

September 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add