• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

एरंडोलच्या टोळीतील तिघांना जिल्हाबंदी

पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने एक वर्षासाठी हद्दपार; कलम ५५ अंतर्गत कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 24, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
एरंडोलच्या टोळीतील तिघांना जिल्हाबंदी

जळगाव प्रतिनिधी एरंडोल शहर व परिसरात गुन्हेगारी टोळी तयार करून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या तिघांना जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ चे कलम ५५ अन्वये ही कारवाई केली. संबंधितांना आदेश मिळाल्यापासून दोन दिवसांत जळगाव जिल्ह्याच्या हद्दीबाहेर जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये टोळीप्रमुख शुभम कैलास महाजन (वय १८, रा. नागोबा मंदिर, एरंडोल), पवन प्रकाश मराठे (वय १९, रा. अमळनेर दरवाजा, एरंडोल) आणि शुभम उर्फ झिंग्या दत्तात्रय पाटील (वय २५, रा. अमळनेर दरवाजा, एरंडोल) यांचा समावेश आहे.

एरंडोल पोलिस ठाण्यात या तिघांविरुद्ध विविध गुन्हे दाखल आहेत. यामध्ये शरीराविरुद्धचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे, जिवे मारण्याचा प्रयत्न तसेच बेकायदेशीर जमाव जमविण्याच्या प्रकरणांचा समावेश आहे. गुन्हा रजि. क्र. ९६/२०२५ मध्ये दोषारोपपत्र क्र. ७६/२०२५ दाखल करण्यात आले असून सेशन केस क्र. १६/२०२५ आहे. याशिवाय गुन्हा रजि. क्र. ३८/२०२६ मध्ये दोषारोपपत्र क्र. ४६/२०२६ दि. २६ जून २०२६ रोजी दाखल झाले आहे. या प्रकरणाचा एससीसी क्र. ११२/२०२६ आहे.

दरम्यान, तिघांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून एरंडोल पोलिस ठाण्यात भा.ना.सु.सं. २०२३ चे कलम १२६ अन्वये प्रकरणे दाखल करण्यात आली होती. त्यानंतर २२ सप्टेंबर रोजी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी हद्दपारीचे आदेश जारी केले.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांविरुद्ध यापुढेही प्रतिबंधात्मक कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाने म्हटले आहे.


 

ताज्या बातम्या

एरंडोलच्या टोळीतील तिघांना जिल्हाबंदी
गुन्हे

एरंडोलच्या टोळीतील तिघांना जिल्हाबंदी

September 24, 2026
घरमालक बाहेर जाताच मोलकरणीने लांबविले ५५ हजारांचे दागिने
गुन्हे

घरमालक बाहेर जाताच मोलकरणीने लांबविले ५५ हजारांचे दागिने

September 24, 2026
ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर
गुन्हे

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार

September 24, 2026
दुष्काळसदृश्य परिस्थितीत पिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
खान्देश

दुष्काळसदृश्य परिस्थितीत पिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

September 24, 2026
काव्यरत्नावली चौकात उलगडले ‘छत्रपतींचे प्रशासन’
खान्देश

काव्यरत्नावली चौकात उलगडले ‘छत्रपतींचे प्रशासन’

September 24, 2026
गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी जळगावात वाहतुकीत मोठे बदल
जळगाव जिल्हा

गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी जळगावात वाहतुकीत मोठे बदल

September 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add