• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

काव्यरत्नावली चौकात उलगडले ‘छत्रपतींचे प्रशासन’

आकर्षक सजावटीतून शिवरायांची कार्यसंस्कृती आणि लोककल्याणकारी प्रशासनाचा जागर; मर्दानी खेळांनी वाढवली रंगत

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 24, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, सामाजिक
0
काव्यरत्नावली चौकात उलगडले ‘छत्रपतींचे प्रशासन’

जळगाव,  (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासनाची कार्यपद्धती, लोककल्याणकारी धोरणे आणि स्वराज्याची संकल्पना नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने काव्यरत्नावली चौकात ‘छत्रपतींचे प्रशासन, कार्यसंस्कृतीचे बीजारोपण’ या संकल्पनेवर आधारित आकर्षक सजावट साकारण्यात आली आहे. भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेला हा देखावा सध्या जळगावकरांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. मर्दानी खेळांच्या सादरीकरणामुळे उपक्रमाची रंगत आणखी वाढली आहे.

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या संकल्पनेतून जैन इरिगेशनच्या कला विभागाने हा देखावा साकारला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासकीय व्यवस्थेतील विविध पैलू तसेच स्वराज्याची संकल्पना प्रभावीपणे मांडण्यात आली असून, त्यातून तत्कालीन प्रशासनाची कार्यसंस्कृती आणि रयतेच्या कल्याणाला दिलेले महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.

काव्यरत्नावली चौकातील श्री गणेशाची आरती जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सौ. ज्योती जैन, डॉ. जयवंत नागूलकर, डॉ. कल्याणी नागूलकर, क्रेडाईचे राज्य उपाध्यक्ष अनिश शहा, यामिनी शहा आणि स्वरूप लूकंड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

अष्टप्रधान मंडळापासून जलव्यवस्थापनापर्यंत प्रशासनाचे विविध पैलू

या देखाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पेशवा, अमात्य, वाकनवीस, दबीर, सचिव, पंडितराव, सर-ए-नौबत आणि न्यायाधीश या आठ प्रमुख पदांच्या माध्यमातून प्रशासनातील विविध विभागांचे कामकाज चालत असल्याचे मांडण्यात आले आहे.

रयतेचे हित केंद्रस्थानी ठेवणारे प्रशासन ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यपद्धतीची महत्त्वाची ओळख होती. वतनदारी पद्धतीला आळा घालणे, सरदार व जहागीरदारांच्या खासगी सैन्याऐवजी राज्याच्या नियंत्रणाखाली सैन्यव्यवस्था उभारणे, तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी बैलजोडी आणि आवश्यक अवजारे उपलब्ध करून देण्यासाठी ‘तगाई’ पद्धतीने कर्ज देणे, यांसारख्या बाबींची माहिती देखाव्यातून देण्यात आली आहे.

‘रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये’ या विचारातून प्रशासनातील शिस्त आणि रयतेच्या मालमत्तेच्या संरक्षणाचा संदेश अधोरेखित करण्यात आला आहे.

पायाभूत सुविधांसह स्वदेशी विचारांवरही भर

जलव्यवस्थापनासाठी तलाव व धरणांची निर्मिती, रस्ते आणि पायाभूत सुविधांचा विकास, व्यापार-वाणिज्याला प्रोत्साहन, किल्ल्यांची तटबंदी, कला व साहित्याला आश्रय, राजनैतिक संबंध, महिला सक्षमीकरण तसेच विविध कल्याणकारी उपाययोजना अशा प्रशासनाच्या विविध क्षेत्रांची माहितीही या देखाव्यात मांडण्यात आली आहे.

स्वदेशी विचार आणि स्वराज्याची संकल्पना यांनाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासनातील विविध पैलू नव्या पिढीला समजावेत आणि त्यांच्या कार्यपद्धतीची ओळख व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

जळगावकरांनी या देखाव्याला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासनाची कार्यपद्धती आणि कार्यसंस्कृती जाणून घ्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


 

Next Post
दुष्काळसदृश्य परिस्थितीत पिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

दुष्काळसदृश्य परिस्थितीत पिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

ताज्या बातम्या

घरमालक बाहेर जाताच मोलकरणीने लांबविले ५५ हजारांचे दागिने
गुन्हे

घरमालक बाहेर जाताच मोलकरणीने लांबविले ५५ हजारांचे दागिने

September 24, 2026
ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर
गुन्हे

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार

September 24, 2026
दुष्काळसदृश्य परिस्थितीत पिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
खान्देश

दुष्काळसदृश्य परिस्थितीत पिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

September 24, 2026
काव्यरत्नावली चौकात उलगडले ‘छत्रपतींचे प्रशासन’
खान्देश

काव्यरत्नावली चौकात उलगडले ‘छत्रपतींचे प्रशासन’

September 24, 2026
गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी जळगावात वाहतुकीत मोठे बदल
जळगाव जिल्हा

गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी जळगावात वाहतुकीत मोठे बदल

September 24, 2026
मावशीच्याच घरावर भाच्याचा डल्ला; २४ तासांत दोघे जेरबंद
गुन्हे

मावशीच्याच घरावर भाच्याचा डल्ला; २४ तासांत दोघे जेरबंद

September 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add