• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विसर्जन मार्गावरील खड्ड्यांवरून महापौर दीपमाला काळे आक्रमक; मक्तेदाराला दूरध्वनीवरून धरले धारेवर..!

विसर्जन मार्गाची दुरुस्ती करण्याचे महापौरांचे आदेश

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 23, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, राजकीय
0
विसर्जन मार्गावरील खड्ड्यांवरून महापौर दीपमाला काळे आक्रमक; मक्तेदाराला दूरध्वनीवरून धरले धारेवर..!

जळगाव, प्रतिनिधी : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेश विसर्जनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शहरातील वार्ड क्रमांक १५ मधील सेवा मंडळासमोरील गणेश विसर्जन मार्गावर पडलेले खड्डे आणि रस्त्यावर पसरलेल्या खडीची महापौर दीपमाला काळे यांनी मंगळवारी (दि. २२ सप्टेंबर) सायंकाळी प्रत्यक्ष पाहणी केली. विसर्जन मार्गाची झालेली दुरवस्था पाहून महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित मक्तेदाराला दूरध्वनीवरून चांगलेच धारेवर धरले आणि उद्या सकाळपर्यंत रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याची कडक तंबी दिली.

गणेश विसर्जन अवघ्या तीन दिवसांवर आले असतानाही महापालिका प्रशासनाकडून सेवा मंडळासमोरील विसर्जन मार्गावरील खड्ड्यांची डागडुजी करण्यात आलेली नाही. शिवाय, स्थानिक मक्तेदाराच्या निष्काळजीपणामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खडी सांडली आहे. या खडीमुळे नागरिक व वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघाताची भीती निर्माण झाली आहे.

विसर्जन मिरवणुकीत भाविकांना आणि गणेश मंडळांना या खड्ड्यांचा व खडीचा फटका बसू नये, यासाठी महापौरांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पाहणीदरम्यान रस्त्याची दुरवस्था पाहून महापौरांनी सोबत असलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. तसेच हलगर्जीपणा करणाऱ्या मक्तेदाराला जागेवरूनच दूरध्वनी करून कडक शब्दांत कानउघाडणी केली. “उद्या सकाळपर्यंत या मार्गावरील सर्व खड्डे बुजवून सांडलेली खडी तात्काळ हटवण्यात यावी आणि रस्ता सुस्थितीत करण्यात यावा,” असे स्पष्ट निर्देश महापौरांनी दिले.

या पाहणीप्रसंगी भाजपचे महापालिकेतील गटनेते तथा स्थानिक नगरसेवक प्रकाश बालाणी, महापालिकेचे अभियंता योगेश वाणी तसेच सेवा मंडळाचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.


 

Next Post
वॉटर मीटरच्या सदोष कारभारावरून महापौरांनी केली कंत्राटदाराची कानउघाडणी

वॉटर मीटरच्या सदोष कारभारावरून महापौरांनी केली कंत्राटदाराची कानउघाडणी

ताज्या बातम्या

रौप्य महोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सवात नाट्यसंगीत, अभंगवाणी आणि ‘बॉलीवूड घराना’ची मेजवानी
जळगाव जिल्हा

रौप्य महोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सवात नाट्यसंगीत, अभंगवाणी आणि ‘बॉलीवूड घराना’ची मेजवानी

November 27, 2026
बोपदेव घाटात भीषण अपघात; जळगावच्या मोहिनीसह तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
खान्देश

बोपदेव घाटात भीषण अपघात; जळगावच्या मोहिनीसह तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

November 27, 2026
कजगावमध्ये तरुणावर अज्ञातांकडून गोळीबार; हल्ल्यात गंभीर जखमी, परिसरात खळबळ
गुन्हे

कजगाव गोळीबार प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

November 27, 2026
रझा कॉलनीत घरफोडी; दीड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
खान्देश

रझा कॉलनीत घरफोडी; दीड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

November 27, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

शिवशाही बसमध्ये महिलेच्या बॅगेतून ४.६३ लाखांचा ऐवज लंपास

November 27, 2026
जळगावात ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव’ पर्व २ चे आयोजन; चित्रपटांची व जादूची दुहेरी मेजवानी
खान्देश

जळगावात ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव’ पर्व २ चे आयोजन; चित्रपटांची व जादूची दुहेरी मेजवानी

November 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add