• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भुसावळ एमआयडीसीतील NRJ Pharmachem कंपनीला भीषण आग

अग्नितांडवामुळे दोन गायींचा मृत्यू; जळगावसह पाच अग्निशमन दलांच्या संयुक्त प्रयत्नांनी आग आटोक्यात

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 22, 2026
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा, राजकीय
0
भुसावळ एमआयडीसीतील NRJ Pharmachem कंपनीला भीषण आग

भुसावळ | प्रतिनिधी भुसावळ एमआयडीसी परिसरातील NRJ Pharmachem Pvt. Ltd. कंपनीला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. प्लॉट क्रमांक D-69 येथे लागलेल्या या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आगीची तीव्रता लक्षात घेता जळगावसह भुसावळ, वरणगाव, दीपनगर आणि वरणगाव फॅक्टरी येथील अग्निशमन बंबांना पाचारण करण्यात आले. सर्व पथकांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

पोलीस कंट्रोल रूमवरून रात्री १२ वाजून ५४ मिनिटांनी आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाचे पथक तातडीने NRJ Pharmachem कंपनीकडे रवाना झाले. पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा कंपनी परिसरात आग मोठ्या प्रमाणात भडकलेली होती. आगीच्या धुराचे आणि ज्वाळांचे स्वरूप पाहता परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात आले.

दरम्यान, घटनास्थळी दोन गायी मृतावस्थेत आढळून आल्या. आगीचा वाढता धोका लक्षात घेऊन अतिरिक्त बंबांना तातडीने पाचारण करण्यात आले. त्यानंतर जळगाव अग्निशमन दल, भुसावळ नगरपरिषद, वरणगाव नगरपरिषद, दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र तसेच वरणगाव फॅक्टरीच्या अग्निशमन बंबांनी संयुक्तपणे आग विझविण्याचे काम सुरू केले.

आगीचा प्रचंड भडका आणि धुराचे लोट यामुळे बचावकार्य आव्हानात्मक बनले होते. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी परिस्थितीची पर्वा न करता शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवले. अनेक बंबांच्या सहाय्याने पाण्याचा मारा करत आगीचा फैलाव रोखण्यात आला. अखेर अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

या अग्निशमन कार्यवाहीत वा.चा. प्रदीप धनगर यांच्यासह फायरमन सौरभ चिकटे, विठ्ठल पाटील, अहत्तेशाम शेख, सुमित सावळे आणि यश मनोरे यांनी सहभाग घेतला.

https://khandeshprabhat.com/wp-content/uploads/2026/09/VID-20260922-WA0148.mp4
https://khandeshprabhat.com/wp-content/uploads/2026/09/VID-20260922-WA0147.mp4

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून संबंधित यंत्रणांकडून तपासणी करण्यात येत आहे. कंपनीचे नेमके किती नुकसान झाले, याचा तपशीलही तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे.


 

ताज्या बातम्या

भुसावळ एमआयडीसीतील NRJ Pharmachem कंपनीला भीषण आग
खान्देश

भुसावळ एमआयडीसीतील NRJ Pharmachem कंपनीला भीषण आग

September 22, 2026
मिशन राइज एक्सच्या यशासाठी युवकांचा सहभाग आवश्यक – श्रीकांत धिवरे
खान्देश

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच; महसूल सहाय्यकासह खासगी वकील एसीबीच्या जाळ्यात

September 22, 2026
भुसावळ तालुका शालेय खो-खो व हॉलीबॉल स्पर्धेला थाटात सुरुवात
खान्देश

भुसावळ तालुका शालेय खो-खो व हॉलीबॉल स्पर्धेला थाटात सुरुवात

September 22, 2026
रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम
जळगाव जिल्हा

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 22, 2026
संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो
कृषी

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

September 22, 2026
जल्लोष लोककलेचा’ स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल प्रथम; राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी निवड
खान्देश

जल्लोष लोककलेचा’ स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल प्रथम; राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी निवड

September 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add