• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 22, 2026
in जळगाव जिल्हा
0
रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

जळगाव, प्रतिनिधी : स्नेहल प्रतिष्ठान या नोंदणीकृत बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गेल्या २५ वर्षांपासून पारंपरिक, सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. यंदा प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असून, ‘॥ पिंप्राळ्याचा राजा ॥’ म्हणून जळगाव शहरात या मंडळाची ओळख आहे. जळगाव शहरातील गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक परंपरेला पिंप्राळा उपनगराशी जोडणारे महत्त्वाचे माध्यम म्हणून स्नेहल प्रतिष्ठानकडे पाहिले जाते. अजिंक्य कमलाकर देसाई स्थापनेपासून या मंडळाचे नेतृत्व करीत आहेत.

केळीच्या खोडापासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती..
समाजप्रबोधनासोबतच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे भान जपत मंडळाने सलग दुसऱ्या वर्षी जळगाव जिल्ह्याचे वैशिष्ट्य असलेल्या केळीच्या खोडापासून ‘पिंप्राळ्याचा राजा’ची मूर्ती साकारली आहे. ठाकूर ब्रदर्स यांच्या हस्ते ही मूर्ती तयार करण्यात आली आहे.

विसर्जनानंतर ही मूर्ती साधारण १२ ते १८ तासांत पाण्यात पूर्णपणे विरघळते. मूर्ती विरघळल्यानंतर त्यातील घटक माशांसाठी खाद्यरूपात उपलब्ध होत असल्याने पाण्याचे प्रदूषण टाळण्यास मदत होते. श्रींच्या मूर्तीचे विसर्जन भावभक्तीने आणि सनातन परंपरेनुसार व्हावे, तसेच विसर्जनानंतर मूर्तीची अवहेलना होऊ नये आणि निसर्गालाही कोणतीही हानी पोहोचू नये, हा या संकल्पनेमागील मुख्य उद्देश असल्याचे प्रतिष्ठानतर्फे सांगण्यात आले.

डीजेला फाटा; पारंपरिक वाद्यांवर आगमन आणि विसर्जन मिरवणूक..
स्नेहल प्रतिष्ठानतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सवात डीजेला फाटा देत पारंपरिक वाद्यांच्या तालावर ‘पिंप्राळ्याचा राजा’चा आगमन सोहळा आणि सार्वजनिक विसर्जन मिरवणूक आयोजित केली जाते. मागील वर्षी विसर्जन मिरवणुकीत भजनांच्या तालावर जळगावकरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. तसेच महिलांना नेतृत्वाच्या संधी देण्यात येत असल्याने गणेशोत्सव आणि सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीत महिलांचा लक्षणीय सहभाग असतो.

२५ वर्षांपासून समाजप्रबोधन आणि सामाजिक उपक्रम..
गेल्या २५ वर्षांपासून गणेशोत्सवादरम्यान समाजप्रबोधनात्मक कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. वारकरी संप्रदायातील नामवंत ७७ कीर्तनकारांची कीर्तने या कालावधीत आयोजित करण्यात आली आहेत. तसेच कीर्तन महोत्सवादरम्यान सेवा देणाऱ्या विविध वारकरी शिक्षण संस्थांना विद्यार्थ्यांच्या उपयोगासाठी सहकार्य केले जाते.

प्रतिष्ठानतर्फे गेल्या २५ वर्षांपासून नेत्रतपासणी शिबिरे, चष्मे वाटप आणि रक्तदान शिबिरांचे आयोजनही करण्यात येत आहे. हिवाळ्यात ब्लँकेटचे तर दिवाळीच्या काळात गरजूंना फराळ आणि मिठाईचे वाटपही करण्यात येते.

याशिवाय जळगाव शहरातील विविध सामाजिक उपक्रमांमध्येही स्नेहल प्रतिष्ठानचा सातत्याने सहभाग राहिला आहे. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त यंदाच्या गणेशोत्सवातही भक्ती, परंपरा, समाजप्रबोधन आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न प्रतिष्ठानतर्फे करण्यात येत आहे.

Next Post
भुसावळ तालुका शालेय खो-खो व हॉलीबॉल स्पर्धेला थाटात सुरुवात

भुसावळ तालुका शालेय खो-खो व हॉलीबॉल स्पर्धेला थाटात सुरुवात

ताज्या बातम्या

मिशन राइज एक्सच्या यशासाठी युवकांचा सहभाग आवश्यक – श्रीकांत धिवरे
खान्देश

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच; महसूल सहाय्यकासह खासगी वकील एसीबीच्या जाळ्यात

September 22, 2026
भुसावळ तालुका शालेय खो-खो व हॉलीबॉल स्पर्धेला थाटात सुरुवात
खान्देश

भुसावळ तालुका शालेय खो-खो व हॉलीबॉल स्पर्धेला थाटात सुरुवात

September 22, 2026
रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम
जळगाव जिल्हा

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 22, 2026
संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो
कृषी

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

September 22, 2026
जल्लोष लोककलेचा’ स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल प्रथम; राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी निवड
खान्देश

जल्लोष लोककलेचा’ स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल प्रथम; राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी निवड

September 22, 2026
जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम; राज्यस्तरीय स्पर्धेचे २७ रोजी आयोजन
जळगाव जिल्हा

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम; राज्यस्तरीय स्पर्धेचे २७ रोजी आयोजन

September 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add