• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

टायर फुटल्याने ४०७ मालवाहू टेम्पोचा अपघात; दोन हमालांचा जागीच मृत्यू

गोंदेगावजवळील दुर्दैवी घटना; पाचोरा, पहूर परिसरात हळहळ

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 17, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
टायर फुटल्याने ४०७ मालवाहू टेम्पोचा अपघात; दोन हमालांचा जागीच मृत्यू

पाचोरा, प्रतिनिधी : पोषण आहार योजनेचे धान्य घेऊन पाचोऱ्याकडून जामनेरच्या दिशेने जाणाऱ्या ४०७ मालवाहू टेम्पोचे अचानक मागील चाकाचे टायर फुटल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले. या अपघातात टेम्पोच्या मागील भागात धान्याच्या गोण्यांवर बसलेले दोन हमाल रस्त्यावर फेकले गेले. गंभीर दुखापत झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. मंगळवारी (१५ सप्टेंबर) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास गोंदेगावजवळील ऋषीबाबा मंदिर परिसरात हा अपघात झाला.

मृतांमध्ये पाचोरा शहरातील कृष्णापुरी भागातील जगदीश लालचंद पाटील (४१) आणि बहिरम नगर येथील अर्जुन तुकाराम पाटील (५२) यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोषण आहार योजनेचे धान्य घेऊन ४०७ मालवाहू टेम्पो (एमएच १४ एफ ३५०४) मंगळवारी सकाळी पाचोऱ्याहून जामनेरच्या दिशेने रवाना झाला होता. टेम्पोच्या मागील भागात धान्याच्या गोण्यांवर जगदीश पाटील आणि अर्जुन पाटील हे दोन्ही हमाल बसले होते.

गोंदेगावजवळ ऋषीबाबा मंदिराजवळ पोहोचताच वाहनाच्या मागील चाकाचा टायर अचानक फुटला. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. टायर फुटल्याने वाहनाचा वेग आणि तोल बिघडल्याने मागील भागातील दोन्ही हमाल गाडीबाहेर फेकले गेले. त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पहूर पोलीस ठाण्याचे एपीआय प्रवीण दात्रे, पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिंबरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला.

दोघांचे पहूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिंबरे तपास करीत आहेत.

अपघातात दोन कर्त्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पाचोरा, पहूर आणि शेंदुर्णी परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, पाचोऱ्यातून नेण्यात येणारे पोषण आहाराचे धान्य नेमके कोणत्या केंद्रासाठी होते, त्याच्या वाहतुकीचे कंत्राट कोणाकडे होते, वाहनाची स्थिती कशी होती आणि वाहतूक करताना आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले होते का, याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अपघाताची जबाबदारी निश्चित करून मृत हमालांच्या कुटुंबीयांना संबंधितांकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणीही होत आहे.


 

Next Post
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

गुलाल अंगावर टाकल्याचा जाब विचारला अन् भावांवर दगडफेक

ताज्या बातम्या

जळगावच्या विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर; आमदार सुरेश भोळे यांच्या पाठपुराव्याला यश
जळगाव जिल्हा

जळगावच्या विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर; आमदार सुरेश भोळे यांच्या पाठपुराव्याला यश

November 6, 2026
जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ
खान्देश

जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

November 5, 2026
स्वच्छता कामे, गटारीच्या विकासाच्या कामांना गती देण्याचे निर्देश
खान्देश

स्वच्छता कामे, गटारीच्या विकासाच्या कामांना गती देण्याचे निर्देश

November 5, 2026
कासोदा पोलिसांची दिवाळीपूर्वी नागरिकांना भेट; १० गहाळ मोबाईल परत
गुन्हे

कासोदा पोलिसांची दिवाळीपूर्वी नागरिकांना भेट; १० गहाळ मोबाईल परत

November 5, 2026
“वॉटर मीटर” मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक
खान्देश

“वॉटर मीटर” मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक

November 5, 2026
दिवाळी पाडव्याला महात्मा गांधी उद्यानात रंगणार ‘पाडवा पहाट’
खान्देश

दिवाळी पाडव्याला महात्मा गांधी उद्यानात रंगणार ‘पाडवा पहाट’

November 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add