• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गणपती स्थापनेच्या तयारीत असतानाच विवाहितेची मुलासह आत्महत्या

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 15, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
गणपती स्थापनेच्या तयारीत असतानाच विवाहितेची मुलासह आत्महत्या

जळगाव, प्रतिनिधी : शहरातील तळेले कॉलनीतील रहिवासी हेमांगी निखिल महाजन (३०) या विवाहितेने आपल्या चार वर्षीय मुलगा शौर्य याच्यासह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (१४ सप्टेंबर) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे तळेले कॉलनी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हेमांगी यांचे पती सैन्यदलात कार्यरत असून सध्या राजस्थान येथे कर्तव्यावर आहेत. हेमांगी या तळेले कॉलनीतील सासरच्या मंडळींसोबत राहत होत्या.

सोमवारी गणेश चतुर्थीनिमित्त तळेले कॉलनीतील विघ्नहर्ता गणेश मंडळात गणपती स्थापनेची तयारी सुरू होती. महाजन कुटुंबीयांसह कॉलनीतील नागरिक गणपती स्थापनेसाठी एकत्र जमले होते. त्यावेळी हेमांगी यांना बोलविण्यासाठी कुटुंबातील सदस्य घरी गेले. मात्र घराचा दरवाजा बंद होता. बराच वेळ आवाज देऊनही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

त्यामुळे शनिपेठ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्यासह सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दरवाजा उघडल्यानंतर हेमांगी आणि त्यांचा मुलगा शौर्य गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. दोघांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केले.

मयत हेमांगी यांचे दीर अक्षय महाजन हे तळेले कॉलनीतील विघ्नहर्ता गणेश मंडळाचे अध्यक्ष आहेत. महाजन कुटुंबातील सर्व सदस्यांचा मंडळाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग असतो. गणेश चतुर्थीच्या दिवशीच ही घटना घडल्याने कॉलनीतील नागरिकांना मोठा धक्का बसला.

हेमांगी यांचे माहेर बांभोरी येथील आहे. त्यांच्या वडिलांचे अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. त्यानंतर आता हेमांगी आणि नातू शौर्य यांच्या मृत्यूची बातमी समजल्याने त्यांच्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ताज्या बातम्या

गणपती स्थापनेच्या तयारीत असतानाच विवाहितेची मुलासह आत्महत्या
गुन्हे

गणपती स्थापनेच्या तयारीत असतानाच विवाहितेची मुलासह आत्महत्या

September 15, 2026
मनपाच्या मानाच्या गणपतीची आगमन मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
जळगाव जिल्हा

मनपाच्या मानाच्या गणपतीची आगमन मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
विघ्नहर्त्याचे आज आगमन; जळगावात २,९९० गणेश मंडळे बाप्पाच्या स्वागताला सज्ज
जळगाव जिल्हा

विघ्नहर्त्याचे आज आगमन; जळगावात २,९९० गणेश मंडळे बाप्पाच्या स्वागताला सज्ज

September 14, 2026
‘मुलगा मानलेल्या’ भाच्याचाच घातक कट; ८५ वर्षीय वृद्धेचा खून करून मृतदेह लपवला
खान्देश

‘मुलगा मानलेल्या’ भाच्याचाच घातक कट; ८५ वर्षीय वृद्धेचा खून करून मृतदेह लपवला

September 13, 2026
गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा-महापौर दीपमाला मनोज काळे 
जळगाव जिल्हा

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा-महापौर दीपमाला मनोज काळे 

September 13, 2026
जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’
खान्देश

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

September 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add