चाळीसगाव | प्रतिनिधी : चाळीसगाव तालुक्यातील कडमळू गावात घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी १ लाख १३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश प्रकाश निकम (वय २८, व्यवसाय शेती, रा. कडमळू, ता. चाळीसगाव) यांच्या घरात ही चोरी झाली. दि. २८ ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजेपासून ते २९ ऑगस्ट रोजी सकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला.

चोरट्याने घरातील कपाटात ठेवलेले २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, २० हजार रुपये किमतीचे ४० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, २० हजार रुपयांची रोकड आणि ५३ हजार रुपये रोकड असा एकूण १ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

घरफोडीची घटना लक्षात आल्यानंतर फिर्यादीने मेहुणबारे पोलिसांना माहिती देत तक्रार दाखल केली. त्यानुसार मेहुणबारे पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक २३६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५, ३३१(३), ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा पुढील तपास पोहेकॉ/१४८० वंदना चव्हाण करीत आहेत. पोलिसांकडून अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे.









