• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जिंकणं महत्त्वाचं; पण खिलाडूवृत्ती जपणं त्याहून महत्त्वाचं : पालकमंत्री गुलाबराव पाटील

राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात; राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा गौरव

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 29, 2026
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
जिंकणं महत्त्वाचं; पण खिलाडूवृत्ती जपणं त्याहून महत्त्वाचं : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, प्रतिनिधी : खेळाडूंनी मैदानावर विजयासाठी प्रयत्न करताना प्रतिस्पर्ध्याचा सन्मान आणि खिलाडूवृत्ती कायम जपली पाहिजे. खेळातून शिस्त, मेहनत, संयम, संघभावना आणि पराभवानंतर पुन्हा उभे राहण्याची ताकद मिळते. जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंमध्ये गुणवत्ता व जिद्द असून, त्यांना आवश्यक सुविधा आणि संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. या सुविधांचा लाभ घेत खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर जळगावचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार सुरेश भोळे, उपमहापौर मनोज चौधरी, जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, नगरसेवक नीलेश तायडे, तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी यांच्यासह श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते, राज्य व राष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू, मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक उपस्थित होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, जळगावच्या खेळाडूंना अत्याधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्ह्यात सुमारे २५० कोटी रुपयांच्या विभागीय क्रीडा संकुलाचे काम सुरू आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलातही विविध सुविधा मंजूर करण्यात आल्या आहेत. खेळाडूंनी या सुविधांचा पुरेपूर उपयोग करून कठोर मेहनत, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवावे. “खेळ आनंदासाठी खेळा, विजयासाठी मेहनत करा आणि देशाचा अभिमान वाढवण्यासाठी जिंका. मात्र विजय मिळवतानाही प्रतिस्पर्ध्याचा सन्मान करून खिलाडूवृत्ती कायम जपा,” असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला उपस्थित प्रत्येकाला एक झाडाचे रोप देऊन त्याचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले. दोन वर्षांनंतर हे रोपटे सुदृढ आणि सुंदर पद्धतीने वाढविणाऱ्या व्यक्तीस पाच हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश धरपुडे व सचिन निकम यांनी केले. जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला पालक, क्रीडाप्रेमी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

Next Post
रस्त्यावरून जाताना व्यापाऱ्याची पावणेदोन लाखांची रोकड लंपास

गोवंशाच्या मांसाची विक्री; संशयितास अटक

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात
गुन्हे

नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
क्रिडा

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा
खान्देश

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा

October 13, 2026
जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
खान्देश

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 13, 2026
नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश
खान्देश

नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add