• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 28, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

​यावल, (प्रतिनिधी) : यावल पोलीस स्टेशनच्या हद्दीतील डांभुर्णी येथे भरचौकात गावठी कट्ट्यातून (पिस्तूल) हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या कोळन्हावी येथील विद्यमान सरपंचाला यावल पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत मध्यरात्री जळगावमधून बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल (मॅगझिनसह) आणि एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे.

​विकास उर्फ गोटू जगन्नाथ सोळंके (वय ३७, रा. कोळन्हावी, ता. यावल) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी सरपंचाचे नाव आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. २७ ऑगस्ट) रात्री ८ वाजेच्या सुमारास डांभुर्णी येथील चौकात एका इसमाने गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केल्याची गोपनीय माहिती यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. माहिती मिळताच पो.नि. धारबळे यांच्यासह पोउपनि मैनुद्दीन सय्यद, पोहेकॉ रोहिल गणेश, पोकॉ अनिल साळुंखे व पोकॉ हितेश बागुल यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तेव्हा डांभुर्णी येथील किनगाव रोडवरील ‘शिवसम्राट सोयाबीन बिर्याणी’ दुकानाजवळ गोळीबार केलेल्या राउंडची रिकामी पुंगळी मिळून आली. परिसरातील दुकानदारांकडे चौकशी केली असता सदर गोळीबार सरपंच विकास सोळंके यानेच केल्याचे निष्पन्न झाले.

​गोळीबार केल्यानंतर आरोपी जळगावकडे पळून गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोउपनि अनिल महाजन आणि पोकॉ सचिन पाटील यांना जळगावकडे रवाना करण्यात आले. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि सोपान गोरे यांच्या पथकातील पोहेकॉ सलीम तडवी, पोकॉ प्रदीप चवरे व पोकॉ सचिन घुगे यांच्या मदतीने संयुक्त शोधमोहीम राबवण्यात आली. अखेर रात्री १ वाजेच्या सुमारास आरोपी विकास सोळंके यास जळगाव येथील काळंका माता मंदिर परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

​दहशत पसरवण्यासाठी केला गोळीबार..
आरोपीची सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीचे कोळन्हावी शिवारात ‘आदर्श हॉटेल, बिअर बार व परमिट रूम’ आहे. डांभुर्णी येथील काही मुले हॉटेलवर येऊन मोबाईलवर व्हिडिओ काढून त्रास देत असल्याने आणि आदल्या दिवशी (२६ ऑगस्ट) त्यांच्याशी भांडण झाल्याने त्यांच्यावर दहशत निर्माण करण्यासाठी डांभुर्णी चौकात येऊन हवेत गोळीबार केल्याचे त्याने सांगितले. गोळीबारात वापरलेले गावठी बनावटीचे पिस्तूल, मॅगझिन आणि एक जिवंत काडतूस त्याने कोळन्हावी शिवारातील स्वतःच्या शेतात लपवून ठेवले होते, जे पोलिसांनी जप्त केले आहे.

​याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. ​सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोउपनि मैनुद्दीन सय्यद, पोउपनि अनिल महाजन, सपोनि हेमंत सांगळे, रोहिल गणेश, हितेश बागुल, सचिन पाटील, अनिल साळुंखे आणि संतोष पाटील यांनी केली. पुढील तपास पोउपनि मैनुद्दीन सय्यद करत आहेत.


 

Next Post
यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक

ताज्या बातम्या

बोपदेव घाटात भीषण अपघात; जळगावच्या मोहिनीसह तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
खान्देश

बोपदेव घाटात भीषण अपघात; जळगावच्या मोहिनीसह तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

November 27, 2026
कजगावमध्ये तरुणावर अज्ञातांकडून गोळीबार; हल्ल्यात गंभीर जखमी, परिसरात खळबळ
गुन्हे

कजगाव गोळीबार प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

November 27, 2026
रझा कॉलनीत घरफोडी; दीड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
खान्देश

रझा कॉलनीत घरफोडी; दीड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

November 27, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

शिवशाही बसमध्ये महिलेच्या बॅगेतून ४.६३ लाखांचा ऐवज लंपास

November 27, 2026
जळगावात ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव’ पर्व २ चे आयोजन; चित्रपटांची व जादूची दुहेरी मेजवानी
खान्देश

जळगावात ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव’ पर्व २ चे आयोजन; चित्रपटांची व जादूची दुहेरी मेजवानी

November 27, 2026
दात साफ करताना सेफ्टी पिन गिळली; डॉक्टरांनी कौशल्याने काढली बाहेर
आरोग्य

दात साफ करताना सेफ्टी पिन गिळली; डॉक्टरांनी कौशल्याने काढली बाहेर

November 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add