• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बोदवडमध्ये घरफोडी; २ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 25, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी

बोदवड | प्रतिनिधी : बोदवड शहरातील रेणुका माता मंदिर परिसरात घरफोडी करून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने आणि रोकड असा तब्बल २ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हुसेन अजगरअली बोहरी (वय ४०, व्यवसाय-व्यापार, रा. रेणुका माता मंदिराजवळ, बोदवड) यांच्या घराला अज्ञात चोरट्याने लक्ष्य केले. चोरट्याने घराच्या दरवाजाचे कडी-कोयंडा आणि कुलूप तोडून घरात अनधिकृत प्रवेश केला.

चोरट्याने घरातील सोन्याचे विविध दागिने तसेच रोकड लंपास केली. चोरी गेलेल्या ऐवजात १ लाख ४३ हजार रुपयांचे ५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कंठहार, ३२ हजार ५०० रुपयांची १२.५ ग्रॅम सोन्याची साखळी, २६ हजार रुपयांच्या प्रत्येकी १० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, तसेच १५ हजार रुपये किमतीच्या चांदीच्या चार वाट्या आणि २० हजार रुपयांची रोकड यांचा समावेश आहे.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपासून २२ ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत ही घरफोडी झाल्याचा संशय आहे. घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.

फिर्यादीच्या तक्रारीवरून बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १७८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम जाधव करीत आहेत. प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक आशिष लव्हंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोरट्याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.


 

Next Post
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले

जामनेरमध्ये गॅस एजन्सीच्या गोदामातून १० गॅस सिलिंडर चोरी

ताज्या बातम्या

बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा
जळगाव जिल्हा

बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा

August 25, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
खान्देश

जामनेरमध्ये गॅस एजन्सीच्या गोदामातून १० गॅस सिलिंडर चोरी

August 25, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बोदवडमध्ये घरफोडी; २ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

August 25, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; २२ वर्षीय संशयिताला अटक

August 25, 2026
आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
खान्देश

आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू

August 25, 2026
स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून भुसावळच्या रिद्धेश अनंत बेंडाळेना मिळाला सन्मान
जळगाव जिल्हा

स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून भुसावळच्या रिद्धेश अनंत बेंडाळेना मिळाला सन्मान

August 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add