• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शिरसोलीतील घरफोडीचा छडा; एमआयडीसी पोलिसांकडून तीन संशयित ताब्यात

साडेसहा लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त; रोकड, सोन्याचे दागिने आणि मोटारसायकलचा समावेश

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 18, 2026
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
शिरसोलीतील घरफोडीचा छडा; एमआयडीसी पोलिसांकडून तीन संशयित ताब्यात

जळगाव : शिरसोली येथे घरफोडी करून चोरी करणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला असून, तीन संशयित आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले आहे. संशयितांकडून चोरीची रोकड, सोन्याचे दागिने आणि मोटारसायकल असा एकूण ६ लाख ६८ हजार ७९० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या या कारवाईमुळे घरफोडी करणाऱ्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले अन् घरफोडी

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरसोली येथील रहिवासी राजेंद्र दौलत आंबाडकर हे ३० एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. ५ मे रोजी सकाळी नऊ वाजता ते घरी परतले असता घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला दिसला. घरात प्रवेश केल्यानंतर साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. घरफोडी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

तांत्रिक तपासातून आरोपींचा माग काढला

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ), ३३१ (३) व ३३१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून उपलब्ध माहिती तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान चोरीच्या गुन्ह्यातील तीन संशयित निष्पन्न झाले.

तिघांना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात

पोलिसांनी मुन्ना शहा सुलतान शहा (वय २२, रा. होळकापूर पोलीस चौकी, बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) याला बुऱ्हाणपूर येथून ताब्यात घेतले. मुस्तकीन ऊर्फ जुनेद भिकन शहा (वय २३, रा. बिस्मिल्ला चौकी, तांबापुरा, जळगाव; हल्ली रा. शिरसोली) याला बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी धाड परिसरातून ताब्यात घेण्यात आले. तर जाबीर शहा जावेद शहा (वय २०, रा. मुस्लिम कॉलनी, बडी खानजवळ, भुसावळ) याला भुसावळ येथून ताब्यात घेण्यात आले.

६ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांच्या माहितीनुसार, मुस्तकीन ऊर्फ जुनेद शहा याच्याविरुद्ध रामानंद, पाळधी, भुसावळ, जिल्हापेठ आदी पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. तिघांकडून १० हजार रुपये रोकड, सोन्याचे दागिने आणि मोटारसायकल असा एकूण ६ लाख ६८ हजार ७९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांच्या पथकाची उल्लेखनीय कामगिरी

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकाने केली.

कारवाईत पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उगले, पोलीस नाईक प्रदीप चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल रमाकांत साळुंखे, नितीन ठाकूर, गणेश ठाकरे, शशिकांत मराठे, योगेश घुगे आदींचा सहभाग होता.

Next Post
जळगावात वृत्तपत्र व डिजिटल मीडिया छायाचित्रकारांचा गौरव; मलाबार गोल्ड अन् प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचा उपक्रम

जळगावात वृत्तपत्र व डिजिटल मीडिया छायाचित्रकारांचा गौरव; मलाबार गोल्ड अन् प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचा उपक्रम

ताज्या बातम्या

जळगावात जागतिक छायाचित्र दिन उत्साहात साजरा; पाच ज्येष्ठ फोटोग्राफरांचा सत्कार
गुन्हे

जळगावात जागतिक छायाचित्र दिन उत्साहात साजरा; पाच ज्येष्ठ फोटोग्राफरांचा सत्कार

August 19, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे जागतिक छायाचित्रण दिवस साजरा
Uncategorized

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे जागतिक छायाचित्रण दिवस साजरा

August 19, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
खान्देश

मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले

August 19, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
खान्देश

डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी

August 19, 2026
जळगावात वृत्तपत्र व डिजिटल मीडिया छायाचित्रकारांचा गौरव; मलाबार गोल्ड अन् प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचा उपक्रम
जळगाव जिल्हा

जळगावात वृत्तपत्र व डिजिटल मीडिया छायाचित्रकारांचा गौरव; मलाबार गोल्ड अन् प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचा उपक्रम

August 19, 2026
शिरसोलीतील घरफोडीचा छडा; एमआयडीसी पोलिसांकडून तीन संशयित ताब्यात
खान्देश

शिरसोलीतील घरफोडीचा छडा; एमआयडीसी पोलिसांकडून तीन संशयित ताब्यात

August 18, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add