• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावात वृत्तपत्र व डिजिटल मीडिया छायाचित्रकारांचा गौरव; मलाबार गोल्ड अन् प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचा उपक्रम

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 19, 2026
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
जळगावात वृत्तपत्र व डिजिटल मीडिया छायाचित्रकारांचा गौरव; मलाबार गोल्ड अन् प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचा उपक्रम

​जळगाव, (प्रतिनिधी) : जागतिक छायाचित्रण दिनाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (दि. १८) मलाबार गोल्ड अँड डायमंड्स आणि प्रेस फोटोग्राफर फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ तसेच सर्व वृत्तपत्र व डिजिटल मीडिया छायाचित्रकारांचा स्नेहमयी वातावरणात भव्य सत्कार व सन्मान करण्यात आला. ​कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि कॅमेरा पूजनाने झाली. याच औचित्याने मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या नवीन डायमंड दागिन्यांचे लॉन्चिंगही करण्यात आले.

​व्यासपीठावर शहराच्या महापौर दीपमाला काळे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, स्टोअर मॅनेजर प्रियंका पाटील, सुजित नायर आणि प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचे अध्यक्ष संधीपाल वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.

​“छायाचित्रकार हे समाजाचे डोळे” – महापौर दीपमाला काळे
आपले मनोगत व्यक्त करताना महापौर दीपमाला काळे म्हणाल्या, “छायाचित्रकार हे समाजाचे डोळे आहेत. समाजात घडणारे सत्य आणि वास्तव आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून लोकांसमोर मांडण्याचे अत्यंत जबाबदारीचे व महत्त्वपूर्ण कार्य तुम्ही करत आहात.”

​फोटोग्राफीमध्ये ‘एथिक्स’ महत्त्वाचे – एसपी श्रीकांत धिवरे
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आपल्या भाषणात स्वतःच्या फोटोग्राफीच्या आवडीला उजाळा दिला. त्यांनी या क्षेत्रातील आपले वैयक्तिक अनुभव सांगतानाच, “फोटोग्राफी करत असताना पत्रकारितेची आणि छायाचित्रणाची नैतिक मूल्ये (एथिक्स) जपणे अत्यंत आवश्यक आहे,” असे आवर्जून नमूद केले.

​कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुमित देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हेमंत पाटील, अभिजीत पाटील, प्रकाश लिंगायत, अरुण इंगळे, जुगल पाटील, पांडुरंग महाले व सचिन पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्याला जळगाव शहरातील आजी-माजी वृत्तपत्र छायाचित्रकार आणि डिजिटल मीडियाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

जळगावात वृत्तपत्र व डिजिटल मीडिया छायाचित्रकारांचा गौरव; मलाबार गोल्ड अन् प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचा उपक्रम
जळगाव जिल्हा

जळगावात वृत्तपत्र व डिजिटल मीडिया छायाचित्रकारांचा गौरव; मलाबार गोल्ड अन् प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचा उपक्रम

August 19, 2026
शिरसोलीतील घरफोडीचा छडा; एमआयडीसी पोलिसांकडून तीन संशयित ताब्यात
खान्देश

शिरसोलीतील घरफोडीचा छडा; एमआयडीसी पोलिसांकडून तीन संशयित ताब्यात

August 18, 2026
शिवरे येथील ग्रामसभेत ग्रामसेवकाशी वाद ; एका आरोपीस अटक
खान्देश

शिवरे येथील ग्रामसभेत ग्रामसेवकाशी वाद ; एका आरोपीस अटक

August 18, 2026
शेतकऱ्याची ३५ हजारांची रोकड लांबविली
खान्देश

जळगावच्या सुवर्ण बाजारात ‘महाठगी’! कारागिराला अडीच कोटींचा गंडा, भामटे फरार

August 18, 2026
भुसावळ येथील दुकानातून सोने लांबवणारा आरोपी अकोल्यातून अटक; ४.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त
खान्देश

भुसावळ येथील दुकानातून सोने लांबवणारा आरोपी अकोल्यातून अटक; ४.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त

August 18, 2026
मिशन राइज एक्सच्या यशासाठी युवकांचा सहभाग आवश्यक – श्रीकांत धिवरे
खान्देश

मिशन राइज एक्सच्या यशासाठी युवकांचा सहभाग आवश्यक – श्रीकांत धिवरे

August 18, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add