• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भुसावळ येथील दुकानातून सोने लांबवणारा आरोपी अकोल्यातून अटक; ४.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; भुसावळ तालुका आणि बोदवड पोलीस ठाण्यातील २ गुन्हे उघडकीस

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 18, 2026
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
भुसावळ येथील दुकानातून सोने लांबवणारा आरोपी अकोल्यातून अटक; ४.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव, प्रतिनिधी : सराफा दुकानातून हातचलाखीने सोने चोरी करून फरार झालेल्या मोहम्मद अली लियाकत अली सय्यद (वय ३८, रा. पापा नगर, खडका रोड, इरणी वस्ती, भुसावळ) या आरोपीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकोल्यातून अटक केली आहे. आरोपीकडून भुसावळ तालुका आणि बोदवड पोलीस ठाण्यात दाखल दोन गुन्ह्यांतील एकूण ४७.४८ ग्रॅम सोने आणि सुमारे ४ लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक १२९/२०२६ आणि बोदवड पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक १२८/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले होते. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे अकोला येथून त्याला ताब्यात घेतले.

तपासादरम्यान आरोपीकडून ३२.४० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड (अंदाजे किंमत ३ लाख २० हजार रुपये) आणि त्याच्या पत्नीकडून १५.०८ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (अंदाजे किंमत १ लाख ७५ हजार रुपये) जप्त करण्यात आली.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि एलसीबी प्रमुख राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली असून आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी ताब्यात देण्यात आले आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार विकास यशवंत बाविस्कर करत आहेत.

Next Post
शेतकऱ्याची ३५ हजारांची रोकड लांबविली

जळगावच्या सुवर्ण बाजारात 'महाठगी'! कारागिराला अडीच कोटींचा गंडा, भामटे फरार

ताज्या बातम्या

शिरसोलीतील घरफोडीचा छडा; एमआयडीसी पोलिसांकडून तीन संशयित ताब्यात
खान्देश

शिरसोलीतील घरफोडीचा छडा; एमआयडीसी पोलिसांकडून तीन संशयित ताब्यात

August 18, 2026
शिवरे येथील ग्रामसभेत ग्रामसेवकाशी वाद ; एका आरोपीस अटक
खान्देश

शिवरे येथील ग्रामसभेत ग्रामसेवकाशी वाद ; एका आरोपीस अटक

August 18, 2026
शेतकऱ्याची ३५ हजारांची रोकड लांबविली
खान्देश

जळगावच्या सुवर्ण बाजारात ‘महाठगी’! कारागिराला अडीच कोटींचा गंडा, भामटे फरार

August 18, 2026
भुसावळ येथील दुकानातून सोने लांबवणारा आरोपी अकोल्यातून अटक; ४.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त
खान्देश

भुसावळ येथील दुकानातून सोने लांबवणारा आरोपी अकोल्यातून अटक; ४.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त

August 18, 2026
मिशन राइज एक्सच्या यशासाठी युवकांचा सहभाग आवश्यक – श्रीकांत धिवरे
खान्देश

मिशन राइज एक्सच्या यशासाठी युवकांचा सहभाग आवश्यक – श्रीकांत धिवरे

August 18, 2026
ना. गिरीष भाऊ महाजन यांच्या संकल्पनेतून महादेव हॉस्पिटलमध्ये शहीद जवानांच्या परिवारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर
खान्देश

ना. गिरीष भाऊ महाजन यांच्या संकल्पनेतून महादेव हॉस्पिटलमध्ये शहीद जवानांच्या परिवारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

August 18, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add