• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 14, 2026
in जळगाव जिल्हा
0
अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

जळगाव, (प्रतिनिधी) : अमरावती येथील जिल्हा क्रीडा संकुलात ९ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या खुल्या युथ फायटर तायक्वांडो चॅम्पियनशिप स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनने सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली.

या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील विविध अकॅडमीच्या खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. बोदवड येथील पॅन्थर तायक्वांडो अकॅडमीने ९ सुवर्ण, ६ रौप्य आणि १२ कांस्यपदकांची कमाई केली. जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या कौशिकी चौबे, जिज्ञासा पाटील, दक्ष पाटील, मयुर पाटील, क्षितीज बोरसे, देवयानी पाटील, निकिता पवार, पुष्पक महाजन आणि यश शिंदे यांनी सुवर्णपदक पटकावले. कोमल गाढे व आरोही गवळे यांनी रौप्यपदक, तर सिद्धी पाटील व ओवी राणे यांनी कांस्यपदक मिळविले.

या यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षक जयेश बावीस्कर, जयेश कासार, निकेतन खोडके आणि निकिता पवार यांचे मार्गदर्शन लाभले. जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललित पाटील, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, सहसचिव रवींद्र धर्माधिकारी, सचिव अजित घारगे, सदस्य नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, सौरभ चौबे, महेश घारगे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमीचे अरविंद देशपांडे यांनी विजेत्या खेळाडूंचे कौतुक केले.

जळगाव जिल्हाने सलग चौथ्यांदा मिळविलेला हा बहुमान जिल्ह्यातील तायक्वांडो खेळाडूंच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचे फलित असल्याचे मानले जात आहे.


 

Next Post
स्वच्छ, हरित व समृद्ध जळगाव घडवण्यासाठी नागरिकांच्या सहभागाचे महापौरांचे आवाहन

स्वच्छ, हरित व समृद्ध जळगाव घडवण्यासाठी नागरिकांच्या सहभागाचे महापौरांचे आवाहन

ताज्या बातम्या

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद
कृषी

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद

October 4, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

इन्स्टाग्रामवरील ओळखीनंतर लग्नाचे आमिष देत तरुणीवर अत्याचार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

October 4, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
क्रिडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार
Uncategorized

दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार

October 4, 2026
पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या
जळगाव जिल्हा

पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या

October 4, 2026
कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या
गुन्हे

कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या

October 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add