• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

स्वच्छ, हरित व समृद्ध जळगाव घडवण्यासाठी नागरिकांच्या सहभागाचे महापौरांचे आवाहन

जळगाव महापालिकेत ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न; महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 15, 2026
in खान्देश, गुन्हे
0
स्वच्छ, हरित व समृद्ध जळगाव घडवण्यासाठी नागरिकांच्या सहभागाचे महापौरांचे आवाहन

स्वच्छ, हरित व समृद्ध जळगाव घडवण्यासाठी नागरिकांच्या सहभागाचे महापौरांचे आवाहन

जळगाव महापालिकेत ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न; महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण

जळगाव : स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त जळगाव शहर महानगरपालिकेत मुख्य ध्वजारोहण सोहळा अत्यंत उत्साही आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात पार पडला. महापालिका प्रांगणात महापौर दीपमाला काळे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. वंदे मातरम, राष्ट्रगीताच्या धून आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

या प्रसंगी महापालिका आयुक्त आदित्य जीवने, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपमहापौर मनोज चौधरी आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांची प्रामुख्याने प्रमुख उपस्थिती होती.

विकासकामांत नागरिकांचा सहभाग आवश्यक : महापौर दीपमाला काळे
ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या, “आज आपला देश विज्ञान, तंत्रज्ञान आणि विकासाच्या नव्या शिखरांवर पोहोचत आहे. या प्रगतीमध्ये आपल्या जळगाव शहराचा आणि नागरिकांचा वाटा अत्यंत मोलाचा आहे. महापौर म्हणून काम करताना जळगावला अधिक स्वच्छ, हरित, सुरक्षित आणि समृद्ध बनवणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे. मूलभूत सुविधांचा विस्तार, बळकट आरोग्य सेवा, दर्जेदार शिक्षण आणि पायाभूत सुविधांचा विकास यासाठी प्रशासन रात्रंदिवस प्रयत्न करत आहे.

पुढील विकासप्रक्रियेबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, कोणताही विकास नागरिकांच्या सक्रिय सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. शहराला देशातील सर्वोत्तम शहरांच्या यादीत नेण्यासाठी प्रत्येक जळगावकराने आपल्या परिसराची नियमित स्वच्छता राखणे, पर्यावरणाच्या रक्षणासाठी झाडे लावणे व ती जगवणे, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि कायद्याचे तंतोतंत पालन करणे असे विविध संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले.

या सोहळ्याला भाजपचे गटनेते प्रकाश बालाणी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते प्रफुल्ल देवकर यांच्यासह सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विविध विभागांचे प्रमुख, नगरसेवक आणि महापालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर उपस्थितांनी एकमेकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या

Next Post
स्वच्छ, हरित व समृद्ध जळगाव घडवण्यासाठी नागरिकांच्या सहभागाचे महापौरांचे आवाहन

स्वच्छ, हरित व समृद्ध जळगाव घडवण्यासाठी नागरिकांच्या सहभागाचे महापौरांचे आवाहन

ताज्या बातम्या

शहीद हुतात्म्यांना मुकुंद गोसावी यांची रक्तदानाने आदरांजली
जळगाव जिल्हा

खान्देश

स्वच्छ, हरित व समृद्ध जळगाव घडवण्यासाठी नागरिकांच्या सहभागाचे महापौरांचे आवाहन

August 15, 2026
अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक
जळगाव जिल्हा

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

August 14, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक अवयवदान दिन उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक अवयवदान दिन उत्साहात साजरा

August 14, 2026
बोगस पत्रकारांवर तात्काळ कारवाई करा; गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाची जिल्हा प्रशासनाकडे मागणी
जळगाव जिल्हा

बोगस पत्रकारांवर तात्काळ कारवाई करा; गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाची जिल्हा प्रशासनाकडे मागणी

August 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add