• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सिन्नरवरून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला कारची धडक; अपघातात १२ भाविक जखमी, सहा जणांची प्रकृती गंभीर

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 12, 2026
in जळगाव जिल्हा
0
सिन्नरवरून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला कारची धडक; अपघातात १२ भाविक जखमी, सहा जणांची प्रकृती गंभीर

पा​चोरा, (प्रतिनिधी) : सिन्नर येथील देवदर्शन आटोपून गावी परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरो पिकअप वाहनाला स्विफ्ट कारने जोरदार धडक दिल्याची भीषण दुर्घटना भडगाव ते पाचोरा दरम्यान घडली. ११ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ११:३० वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. या दुर्घटनेत बोलेरो पिकअपमधील एकूण १२ भाविक जखमी झाले असून, त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव येथील बंजारा समाजातील भाविक सिन्नर तालुक्यातील वडांगडी येथे देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतत असताना पाचोरा-भडगाव रस्त्यावर समोरून येणाऱ्या स्विफ्ट कारने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात संजय पवार (५०), अविनाश पवार (२४), सुनील राठोड (२७), सुपडुबाई ईश्वर पवार (४०), उज्ज्वलाबाई सुनील राठोड (२२) आणि मिराबाई सरिचंद राठोड (६०) हे सहा जण गंभीर जखमी झाले असून, इतर सहा प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.

​अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने भडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, जिथे डॉ. पंकज जाधव यांनी प्राथमिक उपचार केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी सर्व जखमींना पाचोरा येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमींची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सध्या सर्व जखमींवर उपचार सुरू असून, अपघात नेमका कसा घडला यासंदर्भात पोलीस पुढील तपास करत आहेत.


 

Next Post
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन

जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन

ताज्या बातम्या

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद
कृषी

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद

October 4, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

इन्स्टाग्रामवरील ओळखीनंतर लग्नाचे आमिष देत तरुणीवर अत्याचार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

October 4, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
क्रिडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार
Uncategorized

दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार

October 4, 2026
पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या
जळगाव जिल्हा

पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या

October 4, 2026
कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या
गुन्हे

कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या

October 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add