• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

आषाढीच्या पूर्वसंध्येला वारी परंपरेचे रंगमंचावर जिवंत दर्शन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 27, 2026
in मनोरंजन
0
परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

जळगाव, (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील आषाढी वारी ही भक्ती, समता आणि एकात्मतेचे प्रतीक मानली जाते. आषाढ महिना सुरू होताच लाखो वारकऱ्यांची पावले पंढरपूरच्या दिशेने वळतात. या शतकानुशतकांच्या वारी परंपरेचे प्रभावी रंगमंचीय दर्शन घडविणारे ‘पालखी’ हे नाटक परिवर्तनच्या कलावंतांनी आषाढीच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात सादर केले. या प्रयोगाला जळगावकर रसिकांचा उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद लाभला.

दि. बा. मोकाशी यांच्या गाजलेल्या कादंबरीवर आधारित या नाटकाचे नाट्यरूपांतर आणि दिग्दर्शन ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांनी केले आहे. वारीतील भक्ती, समता, लोकसंस्कृती आणि अध्यात्म यांचा प्रभावी आविष्कार या नाटकातून साकारण्यात आला.

प्रयोगाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते विठ्ठल प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, पोलीस निरीक्षक श्रीकांत धिवरे, ज्योती जैन, मुख्य अभियंता आर. एम. मोरे, दीनानाथ शिंदे अमर खत्री, नंदू अडवाणी, ॲड. सुशील अत्रे, तसेच परिवर्तन प्रेक्षक सभासद योजनेचे प्रमुख अनिश शहा, अनिल कांकरिया, अमर कुकरेजा, नंदलाल गादिया, छबीराज राणे, किरण बच्छाव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन शंभू पाटील यांनी केले. विठ्ठलाच्या पूजनानंतर नाटकाला सुरुवात झाली.

परिवर्तनच्या तब्बल ४५ कलावंतांनी या नाटकात सहभाग घेत वारीचे जिवंत दर्शन घडविले. अभंग, भारूड, कीर्तन, रिंगण आणि वारकरी परंपरेतील विविध सांस्कृतिक पैलूंचे प्रभावी सादरीकरण पाहून प्रेक्षक अक्षरशः भारावून गेले.
नाटकाची निर्मिती विनोद पाटील व रंगकर्मी वसंत गायकवाड यांची होती.

नाटकाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे संपूर्ण सभागृहासह बाल्कनीही प्रेक्षकांनी खचाखच भरली होती. अनेक रसिकांना आसन उपलब्ध न झाल्याने त्यांचा हिरमोड झाला आणि काहींना नाटक न पाहताच परत जावे लागले. या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे जळगावकरांनी वारकरी परंपरेवर आधारित या नाटकाला भरभरून दाद दिल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

Next Post
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

ताज्या बातम्या

शहराचा पाणीपुरवठा एक दिवस लांबणीवर; शनिवारी पाणीपुरवठा बंद
खान्देश

शहराचा पाणीपुरवठा एक दिवस लांबणीवर; शनिवारी पाणीपुरवठा बंद

September 12, 2026
भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याची चाकूने सपासप वार करून हत्या; अल्पवयीन संशयित ताब्यात
खान्देश

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याची चाकूने सपासप वार करून हत्या; अल्पवयीन संशयित ताब्यात

September 12, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता

September 10, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
गुन्हे

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

September 9, 2026
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक
गुन्हे

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

September 9, 2026
अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
जळगाव जिल्हा

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

September 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add