• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

चोपडा पोलिसांची अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; ७ किलो गांजासह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 27, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
चोपडा पोलिसांची अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; ७ किलो गांजासह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

​जळगाव, (प्रतिनिधी) : अमली पदार्थांच्या बेकायदेशीर तस्करीविरोधात जळगाव जिल्हा पोलिसांनी विशेष मोहीम तीव्र केली असून, चोपडा ग्रामीण पोलिसांच्या पथकाने एका धडक कारवाईत ७ किलो ११६ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना गजाआड करण्यात आले असून, त्यांच्याकडून कार, मोटारसायकल आणि मोबाईलसह एकूण ६ लाख ८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, दि. २६ जुलै २०२६ रोजी रात्री ११.५३ वाजेच्या सुमारास लासूर ते हातेड जाणाऱ्या रस्त्यावरील पाटचारीजवळ हातेड शिवारात पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी संशयित वाहनाची झडती घेतली असता, कारमध्ये बेकायदेशीरपणे वाहतूक केला जाणारा ७ किलो ११६ ग्रॅम गांजा पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत विष्णू सुभाष सुळे (वय ३७, रा. पिंप्री, जि. पुणे), प्रकाश बबन शिंदे (वय ३०) आणि प्रशांत ताराचंद अथाणी (वय २९, दोघं रा. टाकळीमिया, देवळालीप्रवरा, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) या तिघांना ताब्यात घेतले.

​या कारवाईत पोलिसांनी १ लाख ७७ हजार ९०० रुपये किमतीचा ७ किलो ११६ ग्रॅम गांजा, ३ लाख रुपये किमतीची हुंडाई सॅन्ट्रो कार, ९० हजार रुपयांची पल्सर मोटारसायकल आणि ४१ हजार रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे पाच मोबाईल फोन असा एकूण ६,०८,९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात जळगाव जिल्हा पोलिसांची ही कठोर कारवाई यापुढेही अशीच प्रभावीपणे सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

Tags: chopdaCrimePolice
Next Post
परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

परिवर्तनच्या 'पालखी' नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता

September 10, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
गुन्हे

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

September 9, 2026
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक
गुन्हे

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

September 9, 2026
अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
जळगाव जिल्हा

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

September 9, 2026
७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 9, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
गुन्हे

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add