• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘बोलावा विठ्ठल’ मध्ये चिमुकल्यांचा रंगला रिंगण सोहळा; भक्तिगीतांतून विठ्ठलाची आराधना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 27, 2026
in जळगाव जिल्हा
0
‘बोलावा विठ्ठल’ मध्ये चिमुकल्यांचा रंगला रिंगण सोहळा; भक्तिगीतांतून विठ्ठलाची आराधना

जळगाव, (प्रतिनिधी) : स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व भवरलाल अँड कांताबाई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘बोलावा विठ्ठलं’ या कार्यक्रमाला जळगावकर रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भर पावसातही कांताई सभागृहात विठ्ठलनामाचा गजर, चिमुकल्यांचा उत्साह आणि भक्तिमय स्वर पंढरी अनुभवायला मिळाली.

कार्यक्रमाची सुरुवात अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत साकारलेल्या पालखी-दिंडी व रिंगण सोहळ्याने झाली. टाळ-मृदुंगाच्या गजरात “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले. वारीतील पारंपरिक खेळांचे सादरीकरण करताना चिमुकल्यांनी पावलीचा ताल, फुगडी आणि रिंगण यांचे मनोहारी सादरीकरण केले. भर पावसातही त्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने आणि लयबद्ध सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

यानंतर विद्यार्थ्यांनी विविध भक्तिगीते, अभंग आणि विठ्ठलभक्तीने ओतप्रोत भरलेली सादरीकरणे करून विठ्ठलाची आराधना केली. नृत्यांगन अँकडमीच्या विद्यार्थींनी विठ्ठला ये रे या गाण्यावर विशेष कथ्थक रचना सादर केले.

यावेळी कॅप्टन मोहन कुलकर्णी, चांदोरकर प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, सचिव अरविंद देशपांडे, उपाध्यक्षा दीपिका चांदोरकर उपस्थित होते. ऐश्वर्या परदेशी यांनी गुरुवंदना सादर केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी चांदोरकर प्रतिष्ठान च्या नुपुर खटावकर, चिन्मय खटावकर, ऐश्वर्या परदेशी, वरुण नेवे, स्निग्धा कुलकर्णी, जुईली कलभंडे, ज्ञानेश्वर सोनवणे, भूषण खैरनार, दर्शन जेऊरकर यांच्यासह सर्व विद्यार्थ्यांचे पालक यांनी परिश्रम घेतले.

Next Post
चोपडा पोलिसांची अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; ७ किलो गांजासह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

चोपडा पोलिसांची अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; ७ किलो गांजासह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

ताज्या बातम्या

परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद
मनोरंजन

परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

July 27, 2026
चोपडा पोलिसांची अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; ७ किलो गांजासह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक
गुन्हे

चोपडा पोलिसांची अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; ७ किलो गांजासह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

July 27, 2026
‘बोलावा विठ्ठल’ मध्ये चिमुकल्यांचा रंगला रिंगण सोहळा; भक्तिगीतांतून विठ्ठलाची आराधना
जळगाव जिल्हा

‘बोलावा विठ्ठल’ मध्ये चिमुकल्यांचा रंगला रिंगण सोहळा; भक्तिगीतांतून विठ्ठलाची आराधना

July 27, 2026
वंजारी युवा संघटनेतर्फे जळगावात २४ वा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा दिमाखात संपन्न; ११० विद्यार्थ्यांचा गौरव
जळगाव जिल्हा

वंजारी युवा संघटनेतर्फे जळगावात २४ वा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा दिमाखात संपन्न; ११० विद्यार्थ्यांचा गौरव

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन
जळगाव जिल्हा

आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त पालखी, दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात
शैक्षणिक

आषाढी एकादशीनिमित्त पालखी, दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add